Sunday, 12 June 2022

UPSC च्या तयारीसाठी ३०० विद्यार्थांना प्रशिक्षण

'बार्टी'मार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन 'यूपीएससी' परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस 'बार्टी'द्वारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क देण्यात येते; तसेच विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा दोन हजार रुपये दिले जाते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (BARTI) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पूर्वतयारीसाठी दिल्लीत अनुसूचित जातीतील २०० विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते. यंदा विद्यार्थी संख्येत १०० ने वाढ करण्यात आली असून, आता २०२२-२३ या वर्षापासून ३०० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

'बार्टी'मार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन 'यूपीएससी' परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस 'बार्टी'द्वारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क देण्यात येते; तसेच विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा दोन हजार रुपये दिले जाते. याशिवाय पहिल्या महिन्यातील आर्थिक साह्य तीन हजार रुपये आणि सुरुवातीच्या दिल्ली येथील प्रवासाकरिता पाच हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी पाच हजार रुपये प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षांत टाळेबंदीच्या काळातही उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करून 'बार्टी'मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले होते. 'बार्टी'चे २०२०मध्ये नऊ; तर २०२१मध्ये सात उमेदवार 'यूपीएससी' परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण झाले आहेत. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी https://barti.in या वेबसाइटलाला भेट देण्याचे आवाहन 'बार्टी'चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...