Sunday, 12 June 2022

गोष्ट युक्रेनच्या निर्मितीची…

✳️ १८१७ साली रशियाचे तत्कालीन नेतृत्व लेनिन यांनी सर्वहारा क्रांती करून राजेशाही व्यवस्था संपुष्टात आणली. त्यांनी रशियात कम्युनिस्ट शासन (साम्यवादी) व्यवस्था स्थापन केली. साधारणत: दोन वर्षानंतर बरेच छाेटे-मोठे देश संयुक्त सोव्हिएत संघात (युएसएसआर)  सहभागी झाले. यामध्ये युक्रेनही होता. १९९१ मध्ये संयुक्त सोव्हिएत संघाचे १५ देशांत विभाजन झाले आणि त्याचे नाव ‘रशिया’ झाले. या १५ देशांमध्ये युक्रेनदेखील होता.


🔆 यक्रेनच्या खास गोष्टी कोणत्या?


१) ‘ब्रेड बास्केट ऑफ युरोप’ किंवा ‘युरोपातील धान्याचे कोठार’ या नावाने युक्रेन जगात ओळखला जातो.


२) साधारणत: सहा लाख चौ. कि. मी क्षेत्रफळ असलेला युक्रेन हा युरोपमधील दुसरा मोठा (रशिया हा जगातील आणि युरोपमधीलही सर्वात मोठा देश आहे) देश आहे. तर जगातील ४६ वा मोठा देश आहे.


3) युक्रेनला जवळपास  २, ७८२ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून ‘द्रीपर’ नावाची नदी तिथे प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते.

४) चार कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या देशात १०० महिलांमागे ८६.३ टक्के  पुरूष आहेत. तर ३० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते.


५) युक्रेनची राजधानी कीव असून हे शहर तेथील सर्वात मोठे शहर आहे.


६) युक्रेनियन ही भाषा अधिकृत आहे. तर युक्रेनमध्ये पोलिश, यिडीश, रशियन हंगेरियाई या भाषाही बोलल्या जातात.

७) युक्रेनच्या भौगालिक सीमा पाहता, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया आणि हंगेरी, पूर्व आणि वायव्येस रशिया, उत्तरेस बेलारूस, नैर्ऋत्येस रोमानिया या देशांच्या सीमा आहेत.

८) युक्रेनचे अधिकृत चलन युक्रेनियन रिउनिया (Ukrainian Hryvnia) हे आहे.

९) २४ ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन स्वतंत्र झाला.


१०) युक्रेनचा ध्वज निळा आणि पिवळा या दोन रंगांचा आहे.

११) आपण सर्वाधिक साक्षर देश पाहिले तर लक्षात येईल की, युक्रेन हा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. साक्षरता दर  ९९.८ टक्के असा आहे.

१२) शेतीच्या बाबतीत विचार केला तर, युक्रेन हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे.

१३) जगातील सर्वात सुंदर मुलींचा देश म्हणूनही युक्रेनची ओळख आहे.


१४) हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात मोठे जहाज युक्रेनची राजधानी कीव येथे तयार केले होते. याचं नाव ‘The Antonov An-225 Mriya’ होतं आणि वजन ६, ४०, ००० किलोग्रॅम होते.

१५) युक्रेनमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ख्रिश्चन समुदायाची पाहायला मिळते.

१६) सध्याचे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेन्सकी (Volodymyr Zelenskyy ) हे आहेत.

No comments:

Post a Comment