🎯 महाराष्ट्रातील मुंबई हे शहर सात बेटांनी बनलेले आहे.
🎯 पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती.
🎯 या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले व आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.
☑️ मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे
1) माहीम (Mahim)
2) वरळी (Worli)
3) परळ (Parel)
4) माझगाव (Mazgaon)
5) मुंबई (Bombay)
6) कुलाबा (Calaba)
7) छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island)
🎯 एकसंघ मुंबईची निर्मिती
☑️ या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती.
☑️ ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे.
☑️ जेराल्ड इंजिनिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला.
☑️ त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.
☑️ मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे खडक आहेत.
☑️ त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील खडक मलबार पॉईंट पासून वरळी पर्यंत पसरला आहे.
☑️ या खडकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासून उंची ५५ मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे.
☑️ दुसरा खडक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे.
☑️ या खडकामुळे व नरीमन पॉईंटच्या भूशिरामुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे.
☑️ या दोन्ही खडकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, ॲंटॉप इत्यादी लहानलहान टेकड्या आहेत.
☑️ या दोन्ही खडकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.
No comments:
Post a Comment