Wednesday 1 June 2022

राज्यसेवा पूर्व परीक्षा : 2022 .


◆ CSAT Qualified झाल्यामुळे आता GS ला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. परंतु ज्यांचे CSAT अगोदरच व्यवस्थित नव्हते त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नका.

◆  काही विद्यार्थ्यांच्या मते मागील काही परीक्षेत चालू घडामोडी ची काठिण्य पातळी वाढली आहे. तर माझ्या मते विद्यार्थी जे चालू घडामोडी साठी पुस्तक/मासिक वाचत असतात आणि त्यातून जर परीक्षेत प्रश्न नाही आले तर ते थेट प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली असं म्हणतात. कारण त्या Q चा Source त्यांच्या जवळ नसतो. आणि मुख्यतः आपण विद्यार्थी मासिक/ News Paper खूप वाचतो परंतु आपल्याला जे गरजेचे आहे ते आपण करत नाहीत म्हणजे आपण कधी MCQ ची प्रॅक्टिसचं करत नाहीत. त्यामुळे तो विषय आपल्याला अवघड किंवा त्या विषयाची काठिण्य पातळी वाढली असे वाटते.

◆ आता आपण सर्व विद्यार्थीच आहोत , चालू घडामोडी चे प्रश्न वयक्तिक मला तरी कधी अवघड गेले नाहीत . 15 ते 16 प्रश्नांपैकी हमखास मला मागील परीक्षेत 12 ते 13 मार्क मिळत आले आहेत .माझा  इथे सांगण्याचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आपण चालू घडामोडी कडे खूप दुर्लक्ष करत असतो. परीक्षा जवळ आली की 1 वर्षाचे 12 मासिक एकदाच गोळा करतोत आणि वाचत बसतोत. ही चुकीची पद्धत आहे.

◆ मागील काही आयोगाचे पेपर बघून आपल्याला असे दिसते की किमान आपण परीक्षेच्या अगोदरचे 2 वर्षाचे तरी चालू घडामोडी चांगले करावे म्हणजे आपल्याला  अपेक्षित मार्क मिळतील....

◆ 21 ऑगस्ट ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किमान आपण जानेवारी 2021 पासून चे चालू घडामोडी चांगले केलेच पाहिजे . [ त्या अगोदरचेही काही केले तर उत्तमच ] .

◆ या वर्षी 🔥GS ला किमान 120 चे टार्गेट 🔥ठवा आणि त्यानुसारच अभ्यास करा. अभ्यास हा व्यवस्थित प्लॅन/Schedule नेच करा , काहीही वाचून मार्क मिळत नाहीत.

💐 सर्वांना शुभेच्छा 💐

No comments:

Post a Comment