Friday, 3 March 2023

MPSC च्या अभ्यासावरती मी अजून कोणत्या परीक्षा देऊ शकतो?

  दिवसेंदिवस MPSC स्पर्धा परीक्षा क्षेत्र आव्हानात्मक बनत चालले असून विद्यार्थी आयुष्याची 5-10 वर्ष फक्त MPSC चाच अभ्यास करत असतात.

माहितीचा अभाव आणि अनाठायी भीती यामुळे विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांचा विचार करताना दिसत नाहीत.( मी पण )

तर आज आपण MPSC चाच अभ्यास ( चांगला अभ्यास असलेला विद्यार्थी )इतर परीक्षासाठी कसा उपयोगी ठरु शकतो अशा 2 परीक्षा विचारात घेऊ.

या दोनही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत मी पोहचलो असल्याने त्याविषयी विस्तृत माहिती घेऊ.

1)UPSC CDS- 
                   
-वयोमर्यादा -19-25

-प्रत्येक वर्षी वर्षातून दोनदा UPSC ही परीक्षा Indian Army, Navy आणि Airforce यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी निवडण्यासाठी ही परीक्षा होते. (जर तुम्ही वयाच्या 21-22 वर्षी Select झालात तर तुम्ही या तिन्ही दलातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकता.)
-या परीक्षेचे 2 टप्पे असतात. 
 
पहिला टप्पा MPSC सारखाच Objective व MPSC चाच 90% अभ्यासक्रम असतो. (अभ्यासक्रम Website वरती Check करा.)

- दुसरा टप्पा आपल्या MPSC मुलाखत सारखा असतो. पण त्यामध्ये 3-4 दिवस जवळजवळ 25-30 Obstacles पार करावे लागतात. हा टप्पा सर्वात आव्हानात्मक असतो. व्यक्तिमत्वची सर्वांगीण तपासणी केली जाते.

  त्यामुळे, Defence Forces मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढवण्यासाठी जास्तीत जास्त तरुण विद्यार्थ्यांनी या परीक्षाचा नक्की विचार करावा.

2. UPSC CAPF-

-वयोमर्यादा -19-25(OBC+ALL NT-28 Yrs, SC&ST- 30 Yrs)

- दरवर्षी UPSC भारताच्या PARAMILITARY Forces मध्ये (CRPF,BSF, CISF, SSB, ITBP) Assistant Commandent(Central Dysp)पदासाठी परीक्षा घेते.

-  परीक्षेचे तीन टप्पे असतात.

पहिला टप्पा - यामध्ये 2 Papers असतात.
यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 चा Syllabus असलेला एक 250 Marks चा पेपर असतो व दुसरा पेपर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर सारखा 200 Marks cha असतो.

- दुसरा टप्पा -

Physical आणि Medical(विशेष तयारीची गरज नसते )

तिसरा टप्पा -

मुलाखत -150 marks.
  UPSC द्वारा उमेदवाराची पदासाठी असलेली योग्यता तपासण्यासाठी 150 Marks ची मुलाखत असते.

        तर मित्रांनो, माझे बरेच मित्र जे राज्यसेवा / Combine मध्ये अपयशी ठरलेले (पण आशा न हरलेले )आज CDS/CAPF मध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत.
     
जर MPSC मध्ये वारंवार अपयश येत असेल तर या परीक्षांना कठीण न मानता(न लाजता)आपणदेखील या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या परीक्षांना Seriously घ्यायला हवे.

-टीप-
-UPSC CAPF 2021 form भरण्याची शेवटची तारीख 10 May 2022 आहे.

- CDS ची पुढची जाहिरात May -2022 मध्ये येणार आहे.

या परीक्षाची माहिती जास्तीतजास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही पोस्ट share करा.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...