Mpsc History
युरोपीयांचे भारतात आगमन:
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
» ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली.
» सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस १५ वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती. तथापि, राजा जेम्स पहिला याने इ.स. १६०९ साली कंपनीस कायमची सनद बहाल केली.
» भारतात प्रथम पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज व शेवटी फ्रेंच या क्रमाने युरोपियन सत्ता आल्या. (Trick » PDEF)
» अल्बकुर्क हा पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक मानला जातो. १५१० मध्ये त्याने विजापूरच्या अदिलशाहकडून गोवा प्रांत जिंकून घेतला.
» पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय- डी अल्मेडा, दुसरा व्हाइसरॉय- अल्फान्सो डी अल्बकुर्क.
» भारतात सर्वात जास्त म्हणजे ४५० वर्षे राहिलेली युरोपियन सत्ता म्हणजे पोर्तुगीज सत्ता होय.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
» डी अल्मेडा (१५०४ ते १५०९) – भारतातील पोर्तुगीजांचा प्रथम व्हाइसरॉय. याने पोर्तुगीज साम्राज्याच्या विस्तारासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसीचा स्वीकार केला. भारतात साम्राज्य विस्तारासाठी, भूप्रदेशावर ताबा घेण्यासाठी सागरावरील प्रमुख केंद्रे ताब्यात घेतली.
» अल्बकुर्क (१५०९ ते १५१५) – भारतातील पोर्तुगीजांचा दुसरा व्हाइसरॉय. अल्बकुर्कला भारतातील पोर्तुगीजांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. डॉड वेल नामक इतिहासकाराने अल्बकुर्कची तुलना लॉर्ड क्लाइव्हशी केली आहे.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
» ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला पहिला वकील- कॅ. हॉकिन्स (१६०९).
» १६१५ मध्ये राजा जेम्सच्या पत्राच्या शिफारशीने सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारी येऊन व्यापारी सवलत मिळविण्यात यशस्वी ठरला.
» पोर्तुगीजच्या राजाकडून १६६१ साली आंदण मिळालेले मुंबई बेट राजा चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस वार्षकि भाडेपट्टीने दिले.
» मोगल बादशहा फारखसिअरकडून इंग्रजांनी १७१७ मध्ये मुक्त व्यापाराचे फर्मान मिळविले.
» कंपनीने हुगळी नदीकाठी तीन खेडय़ांची जागा मिळवून तेथे फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला. याच खेडय़ाचे पुढे शहरीकरण होऊन कलकत्ता हे नाव पडले.
» जमिनीमार्गे भारतात येणारा पहिला युरोपियन – मार्को पोलो.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
» िहदुस्थानात येणारा पहिला इंग्रज – थॉमस स्टिव्हन्सन.
» बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह.
» प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.
» फ्रेंच व इंग्रज यांच्या दरम्यानची निर्णायक लढाई, वांदिवॉसची लढाई २२ जानेवारी, १७६० रोजी झाली. फ्रेंच सेनापती काउंट लाली तर इंग्रज सेनापती सर आयर कुट होता. या लढाईने भारतातील फ्रेंच सत्तेचा निर्णायक पराभव झाला.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
» बक्सारची लढाई (२२ ऑक्टोबर, १७६४) – या लढाईत मीर कासिम (बंगालचा नवाब), अयोध्येचा नवाब सुजाऊदौला व मोगल बादशहा शहाआलम यांच्या संयुक्त फौजांचा इंग्रजांनी पराभव केला.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
No comments:
Post a Comment