Saturday, 7 May 2022

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार- पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारात प्रदान केले जातात.

🏵देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार- पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन प्रकारात प्रदान केले जातात.

🔸कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक

व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखांमध्ये /क्षेत्रात हे पुरस्कार प्रदान केले जातात. अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी ‘पद्मविभूषण’; उच्च पदांच्या विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

🔸राष्ट्रपती भवन येथे दरवर्षी मार्च / एप्रिलच्या आसपास आयोजित करण्यात येणाऱ्या औपचारिक कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.

🔸खाली दिलेल्या यादीनुसार यावर्षी राष्ट्रपतींनी 119 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे.

या यादीमध्ये 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 102 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

🔸 पुरस्कार विजेत्यांमध्ये 29 महिला असून या यादीमध्ये परदेशी / एनआरआय / पीआयओ / ओसीआय श्रेणीतील 10 व्यक्ती, 16 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त आणि एक ट्रांसजेंडर व्यक्तीच्या नावाचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...