Tuesday, 3 May 2022

व्यापारी वारे / पूर्वीय वारे

🌬व्यापारी वारे / पूर्वीय वारे 🌬

❇️ उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्तांदरम्यान कर्क व मकरवृत्तीय हवेच्या जास्त दाबाचे पट्टे आहेत.

❇️ येथून विषुववृत्ताजवळील ० ते ५ अंश उत्तर व दक्षिणदरम्यान असणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना 'व्यापारी वारे' असे म्हणतात.

❇️ व्यापारी वारे १० अंश ते २५ अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान वाहत असतात.

❇️ पूर्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे, म्हणून यांना 'व्यापारी वारे' असे म्हणतात.

❇️ पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून यांना 'पूर्वीय वारे' असे म्हणतात.

===========================

No comments:

Post a Comment