Friday, 10 June 2022

हिमालयाच्या पर्वतरांगा आणि हिमालया पलीकडील पर्वतरांगा

महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
हिमालयाच्या पर्वतरांगा

  मधील हा अतिशय महत्वाचा भाग आहे. शिवालिक टेकड्या- शिवालिक टेकड्या हे  हिमालयच्या दक्षिणेकडील श्रेणी आहे. या शिवालिक टेकड्यांना रंग, बाह्य, हिमालय, आणि उप हिमालय श्रेणी म्हणून ओळखले जाते. तरुण, कमी उंचीची व हिमालयातील सर्वात बाहेरचे टेकडी आहे.

हिमालयाच्या पायथ्याशी शिवालिक टेकड्या पाकिस्तानमधील पवार ते  ब्रह्मपुत्रा खोरे इथपर्यंत पसरले गेले आहेत.शिवालिक टेकड्या ची उंची ९०० ते ११००मीटर इतकी आहे.

आणि याची लांबी २४०० किलोमीटर इतकी आहे. व रुंदी दहा ते पन्नास किलोमीटर आहे. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या दऱ्या यांना डून या नावाने ओळखतात.

लघु हिमालय-लघु हिमालयाला निम्न हिमालय आणि मध्य हिमालय ही म्हणून ओळखले जातात.

लघु हिमालयाच्या उत्तरेकडे शिवालिक टेकड्या ह्या ८० किलोमीटरवर आहे. आणि ते हिमालयाच्या एका विशाल पर्वतीय क्षेत्राला लागून आहे.

हिमालया जवळची काही शिखरे समान स्वरूपाच्या आहेत.

बृहद  हिमालय-बृहद हिमालय हे अति उत्तरेकडे असून त्याच्या पर्वतरांगा सर्वोच्च पसरलेल्या आहेत.

बृहद हिमालयाला हिमाद्री म्हणून ओळखले जाते. बृहद हिमालयाचा विस्तार पश्चिमेकडील नंगा पर्वत ते पूर्वेकडे नामचा बरुआ येथे सर्वात लांब पर्वत रांगा आहेत.

पश्चिमेकडील नंगा पर्वताची उंची ८१२६ मीटर इतकी आहे. आणि पूर्वेकडील नामचा बरूआ याची उंची ७७५६ मीटर इतके आहे.

__________________________

हिमालया पलीकडील पर्वतरांगा

                 हिमालयापलीकडील पर्वतरांगांमध्ये लढाख कैलास आणि काराकोरम या पर्वतरांगा येतात.

भारताच्या बाहेर या क्षेत्रात कैलास रांगा आहे.

आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशात लडाख प्रदेश आहे.

माऊंट एव्हरेस्ट हे शिखर नेपाळ पर्वतरांग हिमालय मध्ये आहे. आणि त्याची उंची ८८४८ मीटर आहे.

आणि माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.

नंदादेवी हे कुमाऊ हिमालयामध्ये आहे. ते भारत देशामध्ये येते. त्याची उंची ७८७० मीटर असून ते कुमाऊं तील सर्वात उंच शिखर आहे.

कळसुबाई हे उत्तर सह्याद्री पर्वत रांगातील आहे.

कळसुबाई महाराष्ट्र मध्ये येते त्याची उंची  १६४६ मीटर असून ते महाराष्ट्रामधील सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर आहे.

No comments:

Post a Comment