अनंत सदाशिव अळतेकर
अनंत सदाशिव अळतेकर (३० ऑगस्ट, इ.स. १८९८ - २५ नोव्हेंबर, इ.स. १९५९) हे प्राचीन भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, नाणी यांचे अभ्यासक व इतिहासकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला.[१] संस्कृत व इतिहास विषयाचे व्यासंगी अभ्यासक असलेल्या आळतेकर यांनी बनारस हिंदू विद्यापीठात व पाटणा विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले इतिहासाच्या क्षेत्रातील मौलिक संशोधन आणि त्यांना काशी प्रसाद जयस्वाल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक पद मिळाले शिलालेख ताम्रपट पुरावशेष नानी यांचा त्यांनी विशेष असा अभ्यास केला सर्वांगिन चिकित्सक संशोधन वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती शिक्षण क्षेत्रात पाश्चात्त्यांच्या तुलनेत प्राचीन भारत मागासलेला होता हा समज त्यांनी एज्युकेशन इन इंडिया या ग्रंथाद्वारे दूर केला भारतामध्ये संपन्न उच्च दर्जाची विद्यापीठे होती परदेशी विद्यार्थी देखील येथे विद्यार्जनासाठी साठी येत असल्याचे त्यांनी नमूद केले प्राचीन काळातील स्त्री जीवनाचा अभ्यास करून प्राचीन काळी स्त्रियांना समाजात वरचा दर्जा होता, मध्ययुगात धार्मिक रूढी कर्मकांड व परंपरा अंधश्रद्धा यांचे स्तोम निर्माण झाल्यानंतर स्त्रियांचा दर्जा घसरत गेला असं प्रतिपादन त्यांनी केलं. मनुस्मृती शुक्रनीति अर्थशास्त्र बौद्ध वांड्ग्मय याचा सूक्ष्म अभ्यास करून भारतामध्ये गणराज्य व प्रतिनिधी राज्य होती. राजसत्तेचे वेगवेगळे सिद्धांत प्रचलित होते हे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला महाभारताच्या व्यासपर्व तील राजनीतीचा विचार त्यांनी उलगडून दाखवला. शालिवाहन शक, सवंत्सर यावर लेख लिहून कालगणनेत सुस्पष्टता आणली. इतिहास लेखनात शास्त्रीय दृष्टिकोन व साधनांचे चिकित्सक परीक्षण यावर त्यांनी भर दिला.
कारकीर्द
संपादन करा
पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी इ.स. १९१९ साली बी.ए. व इ.स. १९२२ साली एम.ए. केले. बनारस हिंदु विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर इ.स. १९४९ साली ते पाटणा विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास विभागाचे प्रमुख झाले. नंतर पाटण्यातच के.पी. जयस्वाल संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. अळतेकरांनी बहुतेक ग्रंथलेखन इंग्रजीत केलेले आहे. या ग्रंथांतून भारतीय इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांची सांगोपांग माहिती मिळते. त्यांच्या काही ग्रंथांचे मराठीतूनही अनुवाद झालेले आहेत. 'प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती' या ग्रंथातून वेदकालापासून ते इ.स. १२०० पर्यंतच्या कालातील भारतीय शिक्षणपद्धतीविषयीचे चिकित्सापूर्ण विवेचन अळतेकरांनी केलेले आहे.[२] 'प्राचीन भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान व परिस्थिती' या ग्रंथातून प्राचीन साहित्य, शिलालेख, शिल्पे, प्रवासवृत्ते इत्यादी साधनांच्या आधारे भारतातील स्त्रियांचे शिक्षण, विवाह, घटस्फोट, सतीची चाल, स्त्रियांची वेशभूषा याबाबतची माहिती त्यांनी दिलेली आहे. इ.स. १९४० पासून इ.स. १९५४ पर्यंत त्यांनी भारतीय नाणक परिषदेच्या ज्ञानपत्रिकेचे संपादनही केले. इ.स. १९५८ साली वैशालीजवळ पुरातत्त्वीय उत्खनन करत असताना अळतेकरांना गौतम बुद्धांचे काही पुरावशेष मिळाले. हे अवशेष म्हणजे गौतम बुद्धांच्या अस्थि असल्याचे मानले जाते जे सध्या पाटणा वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत.[३]
लेखन
संपादन करा
'गुजरात आणि काठेवाडमधील मुख्य नगरांचा इतिहास'
'पश्चिम भारतातील ग्रामसंस्थांचा इतिहास' (इ.स. १९२७)
'राष्ट्रकूट आणि त्यांचा काळ' (डी.लिट्. साठी लिहिलेला प्रबंध)
'प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती' (इ.स. १९३४)
'शिलाहारांचा इतिहास' (इ.स. १९३५)
'बनारसचा इतिहास' (इ.स. १९३७)
'प्राचीन भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान व परिस्थिती' (इ.स. १९३८)
'द एज ऑफ द वाकाटकाज ॲंड द गुप्ताज' (इ.स. १९४६)
'स्टेट ॲन्ड गव्हर्नमेंट एन्शन्ट इंडिया'
'कॅटलॉग ऑफ द गुप्त गोल्ड कॉइन्स इन द बयाना होर्ड' (इ.स. १९५६)
'कॉर्पस ऑफ गुप्त कॉइन्स'.
No comments:
Post a Comment