Thursday, 5 May 2022

भारतरत्न पुरस्कार महत्वाचे मुद्दे

भारतरत्न पुरस्कार -----------

महत्वाचे मुद्दे

भारतरत्न पुरस्कार

२०१९ चे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2021
भारतरत्न पुरस्कार या विषयी सविस्तर माहिती ती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

भारतरत्न पुरस्कार भारत देशातील एक अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे.

इतकेच नव्हे तर भारतरत्न पुरस्कार देशातील नागरी पुरस्कार मधील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्कार व्यतिरिक्त भारतामध्ये पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री असे विविध नागरी पुरस्कार आहेत.

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात पुरस्काराचे स्वरूप आणि आत्तापर्यंत किती लोकांना हा पुरस्कार देण्यात आला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २१ जानेवारी १९५४ पासून झाली.

भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप सूर्याची प्रतिकृती आणि देवनागरी लिपी मध्ये भारतरत्न लिहिलेले ब्राँझ धातू पासून बनवलेल्या पिंपळाच्या पानाचा आकार असलेले स्मृतिचिन्ह राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली सनद आणि गळ्यात घालण्याचे पदक अशा स्वरुपात दिले जाते. या पुरस्कारांमध्ये रोख रकमेचा समावेश नसतो.

एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त तीन लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. अपवाद फक्त १९९९ या वर्षीचा आहे. १९९९ मध्ये चार लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. पुरस्काराविषयी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जनता सरकार जेव्हा देशांमध्ये अस्तित्वात आले तेव्हा १९७७ मध्ये या पुरस्कारा वरती बंदी घालण्यात आलेली होती. मात्र १९८० मधले इंदिरा गांधी सरकारने हा पुरस्कार देण्याची पुन्हा सुरुवात केलेली आहे.

आपल्या भारत देशाचा अत्यंत मानाचा पुरस्कार असल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा देखील तितकीच उच्च दर्जाची आहे.

भारत रत्न पुरस्कार आज पर्यंत ४८ व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे.

भारतरत्न पुरस्कार सुरूवातीला म्हणजे १९५४ मध्ये पुढील व्यक्तींना बहाल करण्यात आला.

१) सी राजगोपालचारी
२) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
३) सी व्ही रमण

आज पर्यंत भारत रत्न पुरस्कार मरणोत्तर सुद्धा बहाल करण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार मिळालेली पहिली व्यक्ती लाल बहादूर शास्त्री हे होते.

आज पर्यंत दोन परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे.

खान अब्दुल गफार खान यांना १९८७ मध्ये तर नेल्सन मंडेला यांना १९९० मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती ------------

१) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन  –  १९५४
२) डॉक्टर राजेंद्र प्रसाद  – १९६२
३) झाकीर हुसेन  – १९६३
४) वराहगिरी वेंकट गिरी  – १९७५
५) डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम  – १९९७
६) प्रणव मुखर्जी  – २०१९
राष्ट्रपती पुरस्कार हा आतापर्यंत पाच महिलांना मिळाला आहे

१) इंदिरा गांधी   -१९७१
२) मदर तेरेसा   -१९८०
३) अरुणा आसफ अली  – १९९७
४) एम एस   सुब्बुलक्ष्मी  – १९९८
५) लता मंगेशकर  – २००१
राष्ट्रपती पुरस्कार आतापर्यंत सात पंतप्रधानांना मिळाला आहे

१) पंडित जवाहरलाल नेहरू – १९५५
२) लालबहादूर शास्त्री – १९६६
३) इंदिरा गांधी – १९७१
४) मोरारजी देसाई – १९९१
५) गुलजारी लाल नंदा – १९९७
६) राजीव गांधी – १९९१
७) अटल बिहारी वाजपेयी – २०१५

आजपर्यंत सर्वाधिक भारतरत्न रत्न पुरस्कार प्राप्त नागरिक महाराष्ट्र राज्याचे आहेत.

महाराष्ट्रातील एकूण नऊ व्यक्तींना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे.

महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागतो. उत्तर प्रदेश राज्य एकूण आठ व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे.

२०१९ चे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने
१) प्रणव मुखर्जी
२) भूपेन हजारिका
३) नानाजी देशमुख

2019 चा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख भूपेन हजारिका यांना मरणोत्तर मिळालेला आहे.

______________________________

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2021
१) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 
२) चक्रवर्ती राजगोपालचारी
३) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
४) डॉ. भगवान दास
५) सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
६) पंडित जवाहरलाल
७) नेहरू गोविंद वल्लभ पंत
८)  महर्षी धोंडो केशव कर्वे
९) बिधान चंद्र रॉय
१०) पुरुषोत्तम दास टंडन
११) डॉ. राजेंद्र प्रसाद
१२) डॉ. जाकिर हुसैन
१३) डॉ. पांडुरंग वामन काणे
१४) लाल बहादूर शास्त्री
१५) इंदिरा गांधी
१६) वराहगिरी वेंकट गिरी
१७) के कामराज
१८) मदर तेरेसा
१९) आचार्य विनोबा भावे
२०) खान अब्दुल गफार खान
२१) मुर्दुर गोपाला रामचंदम 
२२) भीमराव रामजी आंबेडकर
२३) नेल्सन मंडेला
२४) राजीव गांधी
२५) सरदार वल्लभभाई पटेल
२६)मोरारजीभाई देसाई
२७) मौलाना अबुल कलाम आझाद
२८) जहांगीर रतनजी दादाभाई टाटा
२९) सत्यजित रे 
३०)एपीजे अब्दुल कलाम
३१) गुलजारी लाल नंदा
३२) अरुणा असिफ अली
३३)एम एस सुब्बलक्ष्मी
३४)सि. सुब्रमण्यम
३५)जयप्रकाश नारायण 
३६) पंडित रविशंकर
३७) अमर्त्य सेन
३८) गोपीनाथ बोरदोलोई
३९) लता मंगेशकर
४०) उस्ताद बिस्मिल्ला खा
४१)पंडित भीमसेन जोशी
४२)सचिन तेंडुलकर
४३) सी एन आर राव
४४)अटल बिहारी वाजपेयी
४५)पंडित मदनमोहन मालवीय
४६) प्रणव मुखर्जी
४७) नानाजी देशमुख
४८)भूपेन हजारिका.

No comments:

Post a Comment