Sunday, 1 May 2022

समाजशास्त्र आणि ऑगस्ट कॉम्त

समाजशास्त्र आणि ऑगस्ट कॉम्त

हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

                    व्यक्तीच्या परस्पर सहचार्यातून सामाजिक संबंध निर्माण होतात. व या सामाजिक संबंधाचा  वैज्ञानिक पद्धतीने आभ्यास केला पाहिजे .असे काही विचारवंतांना वाटू लागले व त्यांनी या सामाजिक संबंधाचा शास्त्रीय पद्धतीने आभ्यास करावयास सुरुवात केली व त्यामुळे प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्त ने भौतिक शास्त्रात उपयोगात आणलेल्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रत  केला व समाजात सुद्धा नौसर्गिक शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे असे स्पष्ट केले .

         समाजशास्त्र मध्ये सामाजिक संबंधाचा आभ्यास केला जातो व हा आभ्यास करत असताना निरीक्षण , वर्गीकरण , गृहीत कृत्य , पूर्वकथान व निष्कर्ष इत्यादी  मार्गाचा अवलंब समाजशास्त्रामध्ये करता येणे शक्य अाहे.असे प्रतिपादन ऑगस्ट कॉम्त यांनी 1828 मध्ये स्पष्ट केले व तेथुनच समाजशात्रीय विचाराची सुरुवात झाली व समाजशात्रीय विचार विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विचारवंतांनी आपले योगदान दिल्याचे दिसून येते. हे विचारवंत आपण खाली पाहूया यात भारतीय विचारवंत देखील आहेत .

विचारवंत

*ऑगस्ट कॉम्त (19 जानेवारी 1798)फ्रेंच

*हबेर्ट स्पेन्सर (27 एप्रिल 1820)लंडन

*इमाईल दरखीम(15 एप्रिल 1858)फ्रांस

*मॅक्स वेबर (21 एप्रिल 1864)जर्मन

*कार्ल मार्क्स (5 मे 1818)जर्मन

भारतीय विचारवंत
संपादन करा
*जी.एस. घुर्यें (12 डिसेंम्बर 1893)

*एम. एन. श्रीनिवास (1916)

*मुजुमदार

*इरावती कर्वे

             वरील सर्व विचारवंतांपैकी ऑगस्ट कॉम्त हे समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात.

ऑगस्ट कॉम्त :-

                       ऑगस्ट कॉम्त यांनी खऱ्या अर्थाने शास्त्रीय दृष्टीकोनातून समाजशास्त्रीय विचारास सुरुवात केली. ऑगस्ट कॉम्तचा जन्म 19 जानेवारी 1798 रोजी झाला. फ्रान्समधील मॉटपेलिअर या शहरात झाला. त्यांचे आई वडील कॅथलिक पंथाचे अनुयायी होते. तर कॉम्त हा कॅथलिक पंथावर टीका करणारा होता. मानावी जीवनचा

विकास घडवून आणण्यासाठी काय करता येईल? याचा विचार करण्यासाठी कॉम्त ने आपले सर्व आयुष्य खर्च केले. या थोर विचारवंतांचे 5 सप्टेंबर 1857 मध्ये निधन झाले. ऑगस्ट कॉम्त यांनी त्यांच्या विहारांची मांडणी खूप छान प्रकारे केली आहे.

          ऑगस्ट कॉम्त ने प्रत्यक्षवाद या ग्रंथामध्ये तीन अवस्थेचा सिद्धांत मंडला. या तीन अवस्थेच्या सिद्धांतात त्याने सर्व मानवी समाजातसर्व काळात मानवी बुद्धीच्या विकासाचा आढावा घेतला. यात कॉम्त म्हणतो, मानवी बुद्धीचा विकास, शास्त्राची प्रगती, मानवी समाजाचा विकास या तीन एकामागून एक येणाऱ्या अवस्थेतून  झालेला आहे. ती अवस्था काल्पनिक अवस्था, अध्यात्मिक किंवा तात्त्विक अवस्था, प्रत्यक्षवादी व वैज्ञानिक अवस्था या तीन अवस्था आहेत.

      समाजाची रचना:-

                        कॉम्त म्हणतो, समाज विकासाच्या तीन अवस्था मधे समाज पायावस्था व समाज रचना ही सुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाची असते . काल्पनिक अवस्थेमध्ये राजेशाही आसते व लष्कराचे राज्य असते .राजा हा सर्व ठिकाणी ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार मनाला जातो .ईश्वर हा राजाचा राजा असून त्याच्या इच्छेनुसार सर्व कारभार चालतो. राजाची आज्ञा न मानल्यास त्यांना शिक्षा मिळते व तुलना नैसर्गिक अधिकार नसतात.

         तात्त्विक अवस्थेमध्ये मानवी विचारांची स्थिती तिथेच न थांबता हळू हळू कल्पना अशी येत गेली की, प्रत्येक घटने मागे ईश्वरच असतो असे नाही.काही अमूर्त शक्ती आहेत व त्याच्यामुळे सुद्धा काही विश्वाच्या घडामोडी घडून येतात. या मानवी शक्तीचा विकास झाल्याचे दिसते.

         शेवटच्या वैज्ञानिक अवस्थेत समाजातब्बद्ल होतात. समाज उद्योग प्रधान बनतो. अनेक नवनवीन शोध लावले जातात.समाजात बौद्धिक सुधारणा होते व समाज जीवन सुखी व संपन्न होण्यास मदत होते.

          कॉम्तचा विज्ञानवादी सिंद्धान्त अतिशय प्रसिद्ध आहे विज्ञानवाद , प्रत्यक्षवाद  किंवा शास्त्रीय दृष्टीकोन असेही म्हणतात .कॉम्त विज्ञानवाद कशाला म्हणावे हे सांगताना ती स्वतःच गोंधळून गेलेला दिसतो. मात्र कॉम्त अवैज्ञानिक राहिला अशी त्याच्यावर टीका केली जाते .

कॉम्त विज्ञानवादाचा अर्थ शास्त्रीय शस्त्रविहित अभ्यास पद्धतीने असाे होतो. कॉम्त मानतो जगातील सर्व घडामोडी मग त्या कोणत्याही स्वरूपाचे असो निश्चित असा नैसर्गिक नियमाद्वारे घडवून येत असतात.

        कॉम्प्तची सामाजिक स्थित्यात्मक व गत्यात्मकतेच संकल्पना ही आहे. स्थित्यात्मक समाज शास्त्राविषयीचा  विचारांमध्ये अपणास व्यवस्थेचा विचार जाणवतो.तर गत्यात्मक समाजशास्त्रात प्रगतीचा विचार मांडला आहे . 

       

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...