🏆 राष्ट्रीय आदर्श पुरस्कारांमधे राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश.🏆
🔰 केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा आली आहे.
🔰 *देशातील ४५ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. यात *राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे.
🔰 *गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यातल्या असरअली इथल्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक खुर्शिद शेख आणि
🔰 *उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या कडदोरा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले शिक्षक उमेश खोसे या दोन शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
🔰 *खुर्शिद शेख यांनी २०१३ मध्ये विद्यार्थ्यांअभावी जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या शाळेला आपल्या प्रयत्नांनी पुन्हा फुलवलं.
शिक्षणातला भाषेचा अडसर दूर करुन त्यांनी विविध प्रयोगांद्वारे मुलांना शिक्षणाची, मराठी भाषेची गोडी लावली. उमेश खोसे यांनीही विविध प्रयोग करत, तंत्रज्ञानाचा वापर करत कडदोऱ्याच्या शाळेचं स्वरुप पालटवून टाकलं.
No comments:
Post a Comment