Monday, 18 March 2024

ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली


ब्रिटीशांच्या काळातील भारतातील (महाराष्ट्रातील शिक्षणपद्धती) :

1781 मतरशाची स्थापना – वॉरेन हेस्टिंग्ज अरबी आणि पारशी भाषेच्या अध्यायनासाठी
1791 बनारसला संस्कृत पाठशाळा – जोनाथम डंकब (बनारसचा इंग्रजी रेसिडेंट)
1800 – Fort William College – लॉर्ड वेलस्ली
कंपानीच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना शिक्षण देण्यासाठी. 1802 मध्ये हे कॉलेज कंपनीच्या संचालकांच्या आदेशावरून बंद केले.
1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार भारतात विद्येच्या प्रसारासाठी वार्षिक एक लक्ष रुपये कंपनीने खर्च करावे अशी तरतूद.

राजा राममोहन रॉय यांनी शिक्षण पाश्चात्य शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई.

वार्षिक एक लक्ष रुपये कसे खर्च करावे यावर ब्रिटीशांच्या लोकशिक्षण समितीत 2 गट-
1. H.T प्रिन्सेस – प्राचीन भारतीय भाषेच्या आणि विद्येच्या प्रसारासाठी खर्च करावेत.

2. इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षणासाठी खर्च करावेत.
हा वाद सोडण्यासाठी बेंटिंगने लॉर्ड मेकॉल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
मेकॉलने दुसर्‍या गटाचे (इंग्रजी शिक्षणाचे) जोरदार समर्थन केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मेकॉल समिती :

अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणार्‍या यूरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल.
पूर्वेकडील (भारतीय) भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही.

शिक्षणाचे माध्यम – इंग्रजी भाषा
मेकॉल असा वर्ग निर्माण करू इच्छित होता.
“जो रक्त व रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नितीमत्ता, बुद्धिमत्तेने इंग्रज असेल.”
म्हणजेच मेकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर काम करणारे करड्या रंगाचे इंग्रज बनवायचे होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

जेम्स थॉमसनची शिक्षण व्यवस्था :

वायव्य सरहद्द प्रांतात (1843-53)
देशी भाषेच्या ग्रामीण शिक्षणाची व्यवस्था
ग्रामीण भागात कृषि विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून शिकवण्याची व्यवस्था सूरु केली.
वुडचा अहवाल – 1854
हा अहवाल भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणून ओळखला जातो.

1.सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे आहे. त्यामुळे सरकारने युरोपियन तत्वज्ञान विज्ञान, कला, साहित्य यांचा प्रसार करावा.
2. प्राथमिक शाळा – प्रादेशिक भाषेचा शिक्षणासाठी वापर – खेड्याच्या पातळीवर
3. जिल्हा स्तरावर – हायस्कूल (माध्यमिक) आणि महाविद्यालये – इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर
4. पदवी – इंग्रजी भाषेचा वापर (उच्च शिक्षणासाठी)
5. शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना चालना देण्यासाठी अनुदान पद्धती सुरू करावी.

6. लंडन विद्यापीठाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुंबई, मद्रास, कोलकाता इथे विद्यापीठे स्थापन करण्यात यावीत.
7. कंपांनीच्या प्रत्येक प्रांतात लोकशिक्षण विभाग स्थापन करावा
8. वुडच्या अहवालात व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणावर (Technical)जोर
9. अध्यापक परिक्षण संस्था स्थापन करण्यात याव्यात (इंग्लंडच्या धर्तीवर)
10. स्त्री-शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची शिफारस.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...