Sunday, 1 May 2022

सामाजिक शास्त्र

सामाजिक शास्त्र

सामाजशास्त्र याच्याशी गल्लत करू नका.
मानवी वर्तन व समाज यांसंबंधीच्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक विज्ञान (Social science) असे म्हणतात.

सामाजिक शास्त्रे ही व्यापक संकल्पना असून् नैसर्गिक शास्त्र नसणाऱ्या सर्व शास्त्रांचा यात सामावेश होतो. उदा. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, शिक्षणशास्त्र इत्यादि.

सामाजिक शास्त्र (इंग्लिश:Social Science) :-

अ) सामाजिक शास्त्र अर्थ :-

समाजातील मानवी वागणुकीचा, वर्तनाचा, हालचालींचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात.

समाजात एकत्रित राहत असताना मानव अनेक प्रकारची वागणूक, हालचाल करीत असतो.

उदा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक इ. अनेक प्रकारच्या हालचाली, वागणूक मानव करीत असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी वागणुकीचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांनी वाटून घेतलेला दिसतो. त्यानुसार समाजातील या वेगवेगळ्या मानवी वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात. हे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

१) अर्थशास्त्र :- मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित, पण पर्यायी उपयोगाची साधने यांच्यात मेळ घालण्यासाठी मानव नेहमी प्रयत्न करीत असतो, यातून जो प्रश्न निर्माण होतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. मानवाच्या या आर्थिक वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो.

२) समाजशास्त्र ( इंग्लिश : SOCIOLOGY) :- मानवाच्या सामाजिक अंतरसंबंधाच्या वागणूक अभ्यास.[१]

३) राज्यशास्त्र :-  राज्यसंस्थेशी असणारा मानवी राजकीय वर्तनाचा अभ्यास.[२]

४) मानसशास्त्र :- मानवी मनाचा, मानवी वर्तनाचा, मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो.[३]

५) मानववंशशास्त्र :- मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास.[४]

६) तर्कशास्त्र

७) इतिहास इ.

ब) सामाजिक शास्त्रातील नियम :- सामाजिक शास्त्र विषयांमध्ये मानवाच्या वेगवेगळ्या वागणुकीचा अभ्यास करून नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे अनेक नियम किंवा सिद्धांत तज्ञांनी मांडलेले आहेत मात्र हे सिद्धांत १००% अचूक नसतात. कारण समाजातील प्रत्येक व्यक्तीचे विचार, बुद्धी, तत्त्वे, आवडीनिवडी, सवयी, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती इ. परिस्थिती वेगवेगळी असते अशा भिन्न प्रवृत्तीच्या सर्व लोकांना नियम लागू करण्यासाठी, हे नियम अचूक ठरण्यासाठी सामाजिक शास्त्रात सिद्धांतामध्ये "गृहीते" मांडावी लागतात.

उदा. अर्थशास्त्रात मागणीचा नियम, पुरवठाचा नियम, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम इत्यादी अनेक नियमांमध्ये “इतर परिस्थिती कायम आहे” अशी गृहिते मांडेेलली आहेत.

क) संपूर्ण समाज हीच प्रयोगशाळा :-  सामाजिक शास्त्राचा अभ्यास, नियम किंवा सिद्धांत नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे बंदिस्त प्रयोगशाळेत पडताळून पाहता येत नाही, तर संपूर्ण समाज हीच सामाजिक शास्त्र विषयांसाठी एक प्रयोगशाळा असते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...