Tuesday, 3 May 2022

रामकृष्ण गोपाळ भांडारकर

रामकृष्ण गोपाळ भांडारकर

विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

रामकृष्ण गोपाळ भांडारकर (जुलै ६, १८३७ - ऑगस्ट २४, १९२५) हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते.

रामकृष्ण गोपाळ भांडारकर
संदर्भ १. कर्नाटकी, श्री. ना. गुरुवर्य डॉ. भांडारकर ह्यांचे चरित्र, पुणे, १९२७.
संपादन करा
२. वैद्य, द्वा. गो. संपा., रा. गो. भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने, मुंबई, १९१९.

३. वैद्य, द्वा. गो. प्रार्थनासमाजाचा इतिहास, मुंबई, १९२७.

चव्हाण, रा. ना.

जीवन

भांडारकरांचा जन्म जुलै ६, १८३७ रोजी महाराष्ट्रात मालवण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, रत्‍नागिरी, मुंबई येथे झाले. काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजामध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचेकुलगुरू होते. ते विधवाच्या विवाहाचे पुरस्कर्ते होते ज्या काळात पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणारे दुर्मीळ होते, त्या काळात डॉ. भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले, आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवले. त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केले. पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानतात.

१८८३साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. (Companion of the Order of the Indian Empire) ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे युरोपात प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स सह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली. भांडारकरांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने पुण्यात इ.स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली.

No comments:

Post a Comment