Mpsc History
मवाळवादी युगात गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका:
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
प्रारंभीचे राष्ट्रवादी मवाळ म्हणून ओळखले जातात. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून साम्राज्यवादाचे केलेले विश्लेषण आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी सतत चालविलेली चळवळ होय.
व्यापार, उद्योग व अर्थव्यवस्था या तिन्ही दृष्टींनी साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेने कशी पिळवणूक केली याचे त्यांनी विश्लेषण केले.
भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविणे हेच ब्रिटिश वसाहतवादाचे सार आहे हे त्यांनी पक्के ओळखले.
केवळ कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश, ब्रिटनमध्ये तयार होणार्या मालाला हुकमी बाजारपेठ व परकीय भांडवल गुंतवणुकीस उत्तम क्षेत्र् असे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप प्राप्त करुन देण्याचा जो ब्रिटिश वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा हेतू होता त्याला त्यांनी जोरदार विरोध केला.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
मवाळवादी युग :-
काॅंग्रेसच्या स्थापनेपासून ते 1905 पर्यत मवाळवादी नेत्यांचा प्रभाव असल्याने त्यास मवाळवादी कालखंड असे म्हणतात.
मवाळवाद्यांची कार्यपध्दत –
(1) इंग्रजांशिवाय भारताचा विकास आणि देशात शांतता सुव्यावस्था प्रस्थापित होणार नाही म्हणून मवाळवादी नेते इंग्रजांशी एकनिष्ठ होते.
(2) इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर विश्र्वास असून ते न्यायानुसारच योग्य कार्य सुधारणा करतील. त्यांच्याकडील अर्ज, विनंत्या क्रमाक्रमाणे सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल
(3) इंग्रजांनी आपणाला क्रमाक्रमाने सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
राष्ट्रीय कॉग्रसचे प्रारंभीचे कार्य –
1885-1905 या काळात मवाळद्यांनी अनेक कार्ये करून आपली उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.
(1) देशातील अनेक धर्म, प्रांत, जाती, यांच्या संदर्भात पूर्वग्रह व गैरसमज होते. ते नष्ट करून सर्वाच्यामध्ये स्नेहसंबंध निर्माण करण्याचे उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.
वसाहतीच्या स्वराज्याची मागणी –
र्लॉड कर्झनच्या अत्याचारी धोरणामुळे आणि आयरिश नेता मि. स्मेडले यांच्या वसाहतीच्या स्वराज्य या कल्पनेनुसार 1905 च्या बनारस अधिवेशात गोखल्यांनी वसाहतीच्या स्वराज्याचा ठराव मांडला व तशी मागणी केली.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
जाचक कायदे रद्दची मागणी –
भारतीयांवर अनेक जाचक कायदे लादले. प्रशासन व न्यायदानात भेदभाव विना चौकशी तुरुंगात ऑम्र्स अॅक्ट 1878 प्रेस अॅक्ट इ. जाचक कायदे रद्द करण्याची मागणी अमरावती अधिवेशनात सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली केली.
लोकजागृतीचे कार्य –
कॉग्रसने अर्ज, विनंत्या करुन जनतेची दु:खे सरकार दरबारांमध्ये मांडली. सभा ठराव लेखन या माध्यमांमधून लोकजागृतीचे कार्य केले.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
सरकार विरुध्द आक्रमक पवित्रा –
काँग्रेस व सरकार यांचे प्रारंभीचे मैत्रीसंबंध कोलकत्या अधिवेशनानंतर राहिले नाहित कारण काँग्रेसने आक्रमक कार्यक्रमांची सुरुवात केली. इंग्रजांविरुध्द अॅटी कॉर्नली लीनच्या चळवळीप्रमाणे चळवळ सूरु करावी असे आदेश दिले.
परदेशातील हिंदी जनतेसाठी कार्य –
इंग्रजांनी त्यांच्या वसाहतीमध्ये अनेक भारतीय मजुरांना पाठविले होते. त्यांच्यावर अन्याय अत्याचार डोइजड कर लादले होते. मतदानाचा व मालमता ठेवण्याचा हक्क नव्हता यासाठी कॉग्रसने संघर्ष करुन न्याय मिळवून दिला.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
परदेशातील हिंदी जनतेसाठी कार्य –
इंग्रजांनी त्यांच्या वसाहतीमध्ये अनेक भारतीय मजुरांना पाठविले होते. त्यांच्यावर अन्याय अत्याचार डोइजड कर लादले होते. मतदानाचा व मालमता ठेवण्याचा हक्क नव्हता यासाठी कॉग्रसने संघर्ष करुन न्याय मिळवून दिला.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
हिंदी जनतेची गार्हाणी मांडली –
भारतीयांच्या विविध क्षेत्रांतील अडचणींचा विचार करण्यासाठी रॉयल कमिशन नेमले.
या प्रसंगी कॉग्रेसने सरकारकडे विविध मागण्या केल्या वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य, पोलिस खात्यात व प्रशासनात सुधारणा शासकीय खर्च कपात, शेतकर्यांना कमी व्याज दरात कर्ज, देशी उद्योगंधद्यांना संरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेतकर्यांना कमी व्याज दरात कर्ज देशी उद्योगधंद्यांना संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात वाढ, स्पर्धा परिक्षा भारतात घ्यावी व वयोमर्यादा कमी करावी.
काॅंगे्रसचे इंग्लंडमधील कार्य –
इंग्लंडमधील जनतेचा व संसदेचा आपल्या हक्कांना पाठिंबा मिळविण्यासाठी इंग्लंडमध्ये चळवळ सुरु केली 1887 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली.
1889 मध्ये ब्रिटिश कमिटी ऑफ दी इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना स्थापन केली.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
No comments:
Post a Comment