Monday, 2 May 2022

वाहतूक आणि दळणवळण याचे काही प्रश्न

वाहतूक आणि दळणवळण

1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
1. भारतातील ग्रामीण व कृषी विकासासाठी ........... ही वाहतूक अत्यावश्यक आहे.
2. भारतातील पहिला रेल्वे मार्ग ........... व ........... या दरम्यान निर्माण करण्यात आला.
3. बेंगळूरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ........... असे म्हणतात.
4. बाँबे समाचार हे वृत्तपत्र ........... मध्ये सुरू झाले.
5. ........... बंदराला ‘भारताचे प्रवेशद्वार’ म्हणतात.
उत्तरे : 1.रस्ते (भूमार्ग वाहतूक) 2. ठाणे ते मुंबई 3.केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ   4. इ.स. 1822  5. मुंबई

2.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. वाहतूक व दळणवळण म्हणजे काय?
उत्तर : वस्तू, सेवा व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी नेण्याच्या व्यवस्थेला ‘वाहतूक’ असे म्हणतात.
एका व्यक्तीकडून दुसèया व्यक्तीकडे किंवा एकाठिकाणाहून दुसèया ठिकाणी बातम्यांची देवाणघेवाण करणे यालाच दळणवळण (संपर्क माध्यमे) असे म्हणतात.

2. सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग व सुपर राष्ट्रीय महामार्ग यावर सविस्तर माहिती लिहा.

उत्तर : 1) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग सुपर राष्ट्रीय महामार्ग
ही एक चौपदरी ते सहापदरी रस्ता निर्मितीची योजना आहे. 1999 मध्ये या योजनेचा प्रारंभ झाला आहे. देशातील अनेक प्रमुख शहरे व सांस्कृतिक तसेच औद्योगिक केंद्रांशी या  रस्त्याच्या जाळ्यांमुळे संपर्क साधणे शक्य झाले आहे. दिल्ली - जयपूर - अहमदाबाद - सुरत - मुंबई - पुणे बेंगळूर - चैन्नई - विशाखापट्टण - भुवनेेशर-कोलकत्ता अहमदाबाद - कानपूर - दिल्ली ही शहरे या रस्त्यामुळे जोडली जातात.
सुपर राष्ट्रीय महामार्गाचे दोन भाग आहेत.
अ) उत्तर - दक्षिण - कॉरिडोर - श्रीनगरपासून कन्याकुमारी पर्यंत हा रस्ता विस्तारला आहे.
आ) पूर्व-पश्चिम कॉरिडोर - आसाममधील सिलचारपासून गुजराथमधील पोरबंदरपर्यंत हा रस्ता विस्तारला आहे. हे रस्ते अनेक प्रमुख शहरे, औद्योगिक केंद्रे व बंदरांना जोडतात.
या रस्त्यांची निर्मिती व व्यवस्थापन याची जबाबदारी ‘भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण’ (National High Way Authority of India) यांच्याकडे आहे.

3. भारतातील रेल्वेमार्ग वाहतुकीचे वर्णन करा.
उत्तर :  ही भारतातील एक महत्त्वाची भूार्ग वाहतूक आहे. जास्त प्रमाणात वस्तूंची ने आण करणे, जास्त प्रमाणात प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी घेऊन जाण्यास रेल्वे वाहतूक फारच उपयुक्त आहे. शेती, उद्योगधंदे व भारताच्या आर्थिक विकासात रेल्वेची भूमिका फार महत्वाची ठरली आहे. या शिवाय देशाचा व्यापार व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी मदत झाली आहे.
रेल्वेमार्गाची निर्मिती ब्रिटीश काळातच सुरु झाली होती. दुष्काळी भागात अन्नधान्याचा व चाèयाचा पुरवठा करणे, सैन्याची एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी रवानगी करणे ही रेल्वेमार्गाची मुख्य उद्दिष्टे होती. भारतात इ.स. 1853 मध्ये ठाणे ते मुंबई या मार्गावर पहिली रेल्वे सुरु झाली. नंतर कोलकत्ता-राणीगंज (1854) मद्रास-अर्कोणम (1864) या रेल्वेमार्गांची निर्मिती झाली नंतर क्रमाक्रमाने देशाच्या इतर भागात रेल्वे मार्गांची निर्मिती करण्यात आली.
रेल्वे वाहतूक ही एक भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था आहे. आज भारतात 64,015 कि.मी. लांबीचे रेल्वोर्ग असून सुारे 7031 रेल्वेस्थानके आहेत. दक्ष कारभार व सुलभ व्यवस्थापनासाठी रेल्वेची 16 विभागात विभागात विभागणी केली आहे. सुरक्षित व आनंददायी रेल्वेच्या प्रवासासाठी अनेक उपाय योजना आखल्या गेल्या आहेत.

4. जलमार्ग वाहतुकीचे महत्त्व थोडक्यात वर्णन करा.



उत्तर :   भारतात प्राचीन काळापासून जलमार्गांचा उपयोग होत आहे. जलमार्गात जहाज, बोट व होडी यांचा वापर करतात.
जलमार्ग वाहतुकीचे दोन प्रकार आहेत. 1) अंतर्गत जलमार्ग 2) सागरी जल मार्ग
1) अंतर्गत जलमार्ग : नद्या, सरोवरे, कालवे, पश्चजल (इरलज्ञ थरींशी) यातून अंतर्गत जलवाहतूक केली जाते प्राचीन काळात भारत देशामध्ये अंतर्गत जलवाहतुकीस फार महत्त्वाचे स्थान होते. आज रस्ते व रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणामुळे त्याचे महत्त्व कमी होत आहे. भारतात अंतर्गत जलमार्गाचा उपयोग वस्तू व प्रवाशांची ने आण करण्यासाठी करतात. गंगा, ब्रम्हपुत्रा व त्यांच्या उपनद्यांद्वारे ही जलमार्ग वाहतूक सुरु होती. दक्षिण भारतात नदी मुखा जवळील प्रदेशात हा मार्गआढळून येतो.
2) सागरी जल मार्ग : समुद्र व महासागर यांच्यामार्फत सुरु असलेल्या जलवाहतुकीला सागरी मार्ग असे म्हणतात. भारताला लांबलचक किनारपट्टी लाभलेली असून काही नैसर्गिक बंदरे आहेत. भारत देश पूर्वगोलार्धाच्या मध्यभागी वसलेला आहे. आमचा जवळजवळ 85% विदेशी व्यापार हा सागरीमार्गाने होतो. हे सर्व घटक सागरी वाहतुकीला पूरक ठरले आहेत.

5. भारतातील वायुमार्ग वाहतूक यावर टीप लिहा.



उत्तर : हा एक वेगवान असा वाहतुकीचा प्रकार आहे. टपाल व प्रवाशांना नेण्यासाठी व आणण्यासाठी उपयुक्त आहे. युद्धे, महापूर, भूकंपासारख्या आपत्ती काळात या वाहतुकीचा फार उपयोग होतो. भारत हा एक विशाल देश असून येथे हवाई वाहतुकीच्या विकासासाठी
अनुकूल वातावरण उपलब्ध आहे.
आज भारतात प्रमुख हवाई वाहतुकीचे व्यवस्थापन व नियमन करणाèया दोन प्रमुख संस्था आहेत.
1) एअर इंडिया इंटरनॅशनल : ही संस्था भारत व जगातील इतर देशांना हवाई वाहतुकीची सेवा पुरविते.
2) इंडियन एअरलाईन्स : ही संस्था भारतात देशांतर्गत व इतर शेजारील देशांना हवाई वाहतुकीची सेवा पुरविते.
आज भारतात ही सेवा खाजगी क्षेत्रांकडे सोपविली आहे. सरकारचा परवाना घेऊन काही खाजगी संस्था हवाई वाहतुकीची सेवा पुरवित आहेत. उदा. जेट एअरवेज सहारा, पॅरामाऊंट, वायूदूत सेवा वगैरे.
विमानतळ -
भारतात 141 विमानतळ आहेत. त्यात 28 आंतरराष्ट्रीय व 88 देशांतर्गत व 25 वायूसेनेशी संबंधित संरक्षणखात्याची विमानतळ आहेत.

6. भारतातील विविध दळणवळण साधनांची नावे लिहा.
उत्तर : आज भारतात विविध प्रकारची दळणवळणाची साधने दिसून येतात. त्यांची दोन प्रकारात विभागणी करतात ती म्हणजे.
अ) वैयक्तिक संपर्क माध्यमे आ) सामूहीक संपर्क माध्यमे
टपाल, टेलिग्राम, टेलिफोन (दूरध्वनी), फॅक्स, इ-मेल, इंटरनेट, सेमिनार, परिषद इ. वैयक्तिक दळणवळणाची साधने आहेत.
वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन, पुस्तके ही सामूहिक संपर्क माध्यमे (दळणवळणसाधने) आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...