Ads

04 May 2022

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार खालील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो :-

आरोग्यसेवा,
उद्योग,
कला,
क्रीडा,
पत्रकारिता,
लोक प्रशासन,
विज्ञान,
समाजसेवा,

निकष,

सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन यापुढे हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.

स्वरुप

पुरस्कार विजेत्याला ₹ १० लाख रोख व प्रशस्तीपत्र दिले जाते. पूर्वी ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते परंतु सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्यात आली.

No comments:

Post a Comment