Thursday, 5 May 2022

मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती


1. मुंबई शहर ----------------

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – मुंबई            
   
क्षेत्रफळ – 157 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 31,45,966 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – नाहीत.
सीमा – उत्तरेस मुंबई उपनगर व दक्षिण-पूर्व या भागात अरबी समुद्र.

जिल्हा विशेष –----------------

1990 मध्ये बृहमुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
राज्यात आकारमानाने किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. मुंबई हे भारताचे प्रवेशव्दार समजले जाते. 1857 मध्ये मुंबई विधापीठाची स्थापना झाली आणि मुंबई व महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया रोवला गेला. महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावलौकिक.
महाराष्ट्रची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, प्रथम क्रमांकाचे औधोगिक शहर.
1877 मध्ये मुंबई येथे शासनमान्य रोखेबाजार स्थापना करण्यात आला असून हा भारतातील पहिला व सुसंघटित रोखेबाजार मानला जातो.
प्रमुख स्थळे

दादर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी.
गेट वे ऑफ इंडिया – प्रेक्षणिय स्थळ (1911 मध्ये राजा पाचवा जार्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी भारताचे प्रवेशव्दार बांधण्यात आले.)


2. मुंबई उपनगर ---------------

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – वांद्रे (बांद्रा)            
क्षेत्रफळ – 446 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 93,32,481 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 3 – अंधेरी, बोरीवली, कुर्ला.
सीमा – उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस ठाण्याची खाडी, दक्षिणेस मुंबई शहर, पश्चिमेस अरबी समुद्र.


जिल्हा विशेष –--------------------

साष्टी बेटाच्या दक्षिण भागात मुंबई उपनगर हा जिल्हा वसला आहे. लोकसंख्येच्या घनतेत या जिल्ह्याचा दूसरा क्रमांक आहे. मुंबई शहराचा पहिला क्रमांक लागतो.
जिल्ह्याच्या उत्तरेस कान्हेरीचे डोंगर आहे व येथेच कान्हेरी लेण्या आहेत.
सागर संपत्ती – मुंबई उपनगरास सागरकिनारा लाभला असून सभोवताली माहीमची खाडी असल्याने येथे मत्स्यव्यवसाय महत्वाचा ठरला. या माशांपासून कॉडलिव्हर ऑईलसारखी जीवनसत्वयुक्त तेले व औषधी तयार करतात. तसेच सागरी मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.


प्रमुख स्थळे-------------------

माऊंट मेरी – सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान.
कान्हेरी लेणी – कान्हेरी डोंगरातील गुंफामध्ये खोदलेल्या लेण्यात भगवान बुद्धाच्या ध्यान-चिंतन अवस्थेतील अनेक सुंदर मूर्ती कोरल्या आहेत.
जुहू चौपाटी – पर्यटकांचे रमणीय स्थळ.
विरार तलाव व पवई तलाव – ही सहलीची ठिकाणे आहेत.
जोगेश्वरीची लेणी – या लेणीमध्ये शंकराच्या सुबक मुर्त्या आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उधान, इत्यादी
मुंबई प्रशासकीय विभाग म्हणजेच कोकण होय.
तालुका, पंचायत समिती व जिल्हा परिषद नसलेला एकमेव जिल्हा म्हणजे मुंबई शहर होय.
मुंबई उपनगर व मुंबई शहर या दोन जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही.

मुंबईच्या भायखळा भागात वीरमाता जिजाबाई उधान आहे.

मुंबईजवळचे मासेमारीचे मोठे केंद्र वर्सोवा
महाराष्ट्र कृषि उधोग विकास महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण मुख्यालय मुंबई येथे आहे.

मुंबईतील दादर व नायगांव पासून महालक्ष्मी व भायखळा पर्यंतच्या भागास गिरणगांव मुंबई असे म्हणतात.
टाटा ईन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था मुंबई येथे आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा मुंबई शहर (21,189 व्यक्ति प्रती चौ.कि.मी.)
मुंबईतील तलाव तुळशी, विरार व पवई हे आहेत.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर (157 चौ.कि.मी)

मुंबईच्या महालक्ष्मी भागात घोड्यांच्या शर्यतीचे मैदान आहे.

महाराष्ट्रातील आधुनिक कत्तलखाना – देवनार (मुंबई)



3. ठाणे

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – ठाणे                
क्षेत्रफळ – 4,241 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 96,18,953 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 07 – शहापूर, भिवंडी, मुरबाड, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ.
सीमा – उत्तरेस पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस रायगड जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला लागून नाशिक व अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत.
जिल्हा विशेष –

राज्यात सर्वाधिक महानगरपालिका असलेल्या जिल्हा, ठाणे शहरास पूर्वी लष्करी स्थानक म्हणत. त्यावेळेस येथे लष्करी तळ होता. त्यावरूनच या शहरास थाणा व पुढे ठाणे असे नाव पडले.
ठाणे शहरात सोपारा येथे अशोकाचा शिलालेख व स्तूप आहे. त्यांच्याच काळात या भागात बोद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार झाला.

प्रमुख स्थळे --------_--------

ठाणे – कोपिनेश्वराचे मंदिर प्रसिद्ध.
अंबरनाथ – डल्हासनगर तालुक्यातील मुंबई-पुणे लोहमार्गावर हे शहर वसले आहे. अंबरेश्वराच्या क्षेत्रामुळे या ठिकाणाला अंबरनाथ हे नाव पडले. या ठिकाणी दारूगोळा व शस्त्रास्त्रांचा कारखाना आहे.




4. पालघर

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – पालघर      
    
क्षेत्रफळ – 5,766 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 14,35,178
तालुके – 05 – विक्रमगढ, डहाणू, वसई, पालघर, ओवळा-मातीवडा
सीमा – उत्तरेस गुजरात राज्य व दादर-नगरहवेली हा संघशासित किंवा केंद्रशासित प्रदेश, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस ठाणे जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला लागून नाशिक व अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत.

जिल्हा विशेष ---------------

1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा जिल्हा निर्माण करण्यात आला. वसईचा भुईकोट किल्ला 23 मे 1739 रोजी थोरल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला.
प्रमुख स्थळे

पालघर – पालघर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून पालघर जवळ ‘तारापुर’ येथे भारतातील पहिला अणुविधुत प्रकल्प उभारण्यात आला आहे.

मनोर – वाहतुकीचे केंद्र
वसई – पोर्तुगीजाकडून चिमाजी आप्पांनी जिंकलेला ऐतिहासिक किल्ला.

वसईची केळी व विडयाची पाने प्रसिद्ध.
बोर्डी – हे एक रमणीय ठिकाण असून येथील किल्ला प्रेक्षणीय आहे. येथेच उद्वाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळ आहे.

जव्हार – आदिवासींची बहुसंख्या दिसून येते. त्यामुळे आदिवासी उपाययोजणेमार्फत आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात.
ठाणे हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा आहे.

ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका – 1. ठाणे, 2. नवी मुंबई, 3. कल्याण-डोंबिवली, 4. भिवंडी-निजामपुर, 5. उल्हासनगर, 6. मीरा-भाईदर या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील वाशी गावाच्या परिसरात नवी मुंबई वसविली आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठा बोगदा पारसिक आहे.
ठाणे जिल्ह्याचे मुख्य पीक भात हे आहे.
पालघर जिल्ह्यात अणुशक्तीपासून वीज तयार करण्याचे केंद्र तारापुर ला आहे.
पालघर जिल्ह्यात काचेच्या बांगड्या चिंचणी व तारापुर येथे तयार होतात.

5. रायगड

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – अलिबाग          

क्षेत्रफळ – 7,152 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 26,35,394 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 15 – कर्जत, पनवेल, उरण, मुरुड, पेण, रोहा, खालापूर, सुधागड, अलिबाग, माणगाव, म्हसाळे, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, तळा.
सीमा – उत्तरेस ठाणे जिल्हा , पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला लागून पुणे जिल्हा आहे. आग्नेयेस सातारा जिल्हा.


जिल्हा विशेष -------------

पूर्वीचे नाव कुलाबा. या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड हा किल्ला असल्याने या जिल्ह्याचे रहिवासी असलेले महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या कारकिर्दीत कुलाबा जिल्हयांचे नामकरण 1 जानेवारी 1981 रोजी रायगड असे करण्यात आले.
शिवरायांचा उजवा हात म्हणून ज्यांची ओळख आहे ते तानाजी मालुसरे याच जिल्ह्यातील उमरठ गावचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विधापीठाची स्थापना याच जिल्हयात लोणेर येथे करण्यात आली.


प्रमुख स्थळे ------------------

किल्ले – शिवरायांची समाधी व राजधानी असलेला प्रसिद्ध किल्ला रायगड येथेच आहे. कर्नाळा किल्ला, पाली किल्ला, मढ किल्ला हे प्रसिद्ध शिवकालीन किल्ले याच जिल्ह्यात आहेत.
गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान पेण तालुक्यात आहे.
खांदेरी किल्ला – जवळच चोला येथे बोद्धकालीन लेणी आहे.
अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाते. हे समुद्रकिनारी आहे. कान्होजी आंग्रे यांचे स्मारक.
हिराकोट – हा भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.
शिरढोण – आध क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव.
महाड – चवदार तळ्याच्या सत्याग्रह येथेच झाला.
मुरुड-जंजिरा – अभेध असा जलदुर्ग.
माथेरान – थंड हवेचे ठिकाण.
घरापुरी – मुंबईपासून जवळ असलेल्या येथील ‘एलिफंटा कव्हेज’ रायगड जिल्ह्यात आहेत.
भिवपुरी जलविधुत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे.
रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नांव कुलाबा हे होते.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे.
तकाई हे धार्मिक स्थळ रायगड या जिल्ह्यात आहे.
घारापुरी लेणी (एलिफंटा) रायगड जिल्ह्यात आहे.


6. रत्नागिरी

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – रत्नागिरी        
   
क्षेत्रफळ – 8,208 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 16,12,672 (सन 2011 च्या जनगणनेसुसार)
तालुके – 9 – मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर (देवरुख), लांजे.
सीमा – उत्तरेस रायगड जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला लागून सातारा, सांगली व कोल्हापूर हे तीन जिल्हे आहेत.


जिल्हा विशेष ---------------

रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रमध्ये अनेक केल्ले असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो.
रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये फुरसे हे नाव असलेले विषारी साप प्रामुख्याने आढळतात.
देशभक्त आणि समाज सेवकांचा जिल्हा. रत्नागिरीजवळच कुरबुडे येथे सुमारे 6.5 किमी. लांबीचा आशियातील सर्वात लांब बोगदा आहे.



प्रमुख स्थळे --------------


किल्ले – अंजनवेलचा किल्ला, शिवकालीन रत्नदुर्ग, जयगड, पूर्णगड, बाणकोट, मंडणगड, गोवळकोट, गोपाळगड, यशवंतगड, महिपतगड, जिवयगड, आंबोळगड, समळगड, रसाळगड इत्यादी अनेक किल्ले या जिल्ह्यात आहेत.

रत्नागिरी – लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान. वि.दा. सावरकर यांच्या सामाजिक कार्याची सुरवात रत्नागिरी मध्येच झाली. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी भागेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. सावरकरांनी इ.स.1929 मध्ये बांधलेले पतितपावन मंदिर येथे आहे.

मालगुंड ते पूर्णगड – ईल्मेनाईटचे साठे आढळतात.
गणपतीपुळे – रत्नागिरीपासून 40 कि.मी. अंतरावर गणपतीपुळे हे ठिकाण एक पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
समुद्रकिनार्‍यावरील गणपती मंदिर अष्टविनायकांपैकी एक स्थान.

गुहागर – हे तालुक्याचे ठिकाण असून येथील सुपारी व नारळ प्रसिद्ध आहे.

हर्णे – दापोली तालुक्यात हर्णे हे बंदर असून सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग किल्ला या ठिकाणी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात औषधे बनवण्याचे उधोग आंजर्ले व चिपळूण येथे आहेत.
देवरुखजवळ साडवली येथे सिट्रोनेला गवतापासून तेल काढतात.

स्टेनलेस स्टीलची भांडी तयार करण्याचा उधोग चिपळूणला आहे.

शाडू या मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करतात.
पोलादी कानशी बनविण्याचा उधोग रत्नागिरी येथे आहे.
सिमेंट तयार करणे व होड्या बांधणे हे मोठे उधोग रत्नागिरी आहेत.

रत्नागिरीत छत्रपती शिवाजी स्टेडीयम आहे.
थिबाचा राजवाडा रत्नागिरीत आहे.

जहाज बांधण्याचा कारखाना मिर्‍या येथे आहे.
पावस गावी स्वामी स्वरूपानंदाची समाधी आहे.
दापोली तालुक्यात केळशी याकुबाबा यांचा दर्गा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक भात हे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ईल्मेनाईट खनिज सापडते.


7. सिंधुदुर्ग

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – ओरोस बुद्रुक     
      
क्षेत्रफळ – 5,207 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 8,48,868 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 8 – कुडाळ, देवगड, सावंतवाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्ले, वैभववाडी, दोडामार्ग.
सीमा – उत्तरेस रत्नागिरी जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगेला लागून कोल्हापूर जिल्हा आहे.


जिल्हा विशेष –---------------


रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून 1 मे 1981 ला महाराष्ट्र दिनाच्या शुभ माहूर्तावर सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला.
सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला पवन विधुत प्रकल्प जमसांडे, ता. देवगड येथे उभयारण्यात आला.
प्रमुख स्थळे.

किल्ले  – विजयदुर्ग किल्ला, पदमदुर्ग, रंगणा, मनोहरगड, रामगड, यशवंत गड हे या जिल्ह्यातील महत्वाचे किल्ले आहेत.
कणकवली – भालचंद्र महाराजांचे समाधीस्थान.
अंबोली – निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. अंबोलीपासून जवळच नारायणगड व महादेवगड हे डोंगरी किल्ले आहेत.

कणकेश्वर – यादवकालीन शिवमंदिर
विजयदुर्ग – शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग.
फोंडा – सह्याद्री पर्वतावरचा घाट. फोंडा घाटातील मध प्रसिद्ध आहे.

देवगड – देवगड तालुक्यातील साळशी गावाजवळ सदानंदगड हा गिरीदुर्ग किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे गावापासुन 52 कि.मी. वर विजयदुर्ग का किल्ला आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी तट आहे.

मावळण – मावळण तालुक्यामध्ये रामगड, सिद्धगड, वेताळगड, भगवंतगड व भरतगड हे गिरीदुर्ग किल्ले आहेत.

पद्मदुर्ग राजकोट व सर्जेकोट हे किनारीदुर्ग किल्ला आहे.

कुडाळ – कुडाळ तालुक्यातील घेटगे गावाजवळ सोनगड किल्ला, शिवापुर जवळ मनोहर आणि मनसंतोष किल्ल्यांची जोडी आहे.

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे.
महाराष्ट्रातील पहिला पवन विधुत प्रकल्प जामसांडे, देवगड (सिंधुदुर्ग)
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अंबोली (747 सें.मी.) सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरोस बुद्रुक हे आहे.
सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी हे शहर पूर्वीच्या संस्थांनाची राजधानी होती.

सिधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहरात सुंदर राजवाडा व मोती तलाव आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात दीपगृह निवती येथे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले सेंट ल्युकचे हॉस्पिटल आहे.

पावसाच्या स्वामी स्वरुपानंदानी ज्ञानेश्वर मंदिराची स्थापना वेंगुर्ले येथे केली.

सिधुदुर्ग जिल्ह्यात दुध व्यवसायाचे मुख्य केंद्र कणकवली हे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू संशोधन केंद्र वेंगुर्ले हे आहे.

विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग येथे आहे.          

No comments:

Post a Comment