Friday, 10 June 2022

तालिबानी कोण आहेत?

तालिबानी कोण आहेत?

पुश्तन जमातीच्या मुल्ला मोहम्मद ओमरने दक्षिण अफगाणिस्तानमध्ये तालिबानची स्थापना केली.

कमांडर म्हणून सूत्र हाती घेत त्याने अफगाणिस्तानमधून सोव्हिएत्सला १९८९ ला हद्दपार केलं. अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत काळातील अस्थैर्य, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी मुल्ला ओमरने १९९४ मध्ये कंदाहारमध्ये ५० समर्थकांसह एका गटाची स्थापना केली.

तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो. संस्थापक सदस्य मुल्ला ओमरच्या मार्गदर्शनात शिकत असल्यामुळे हा संदर्भ दिला जातो. तालिबानने काही काळातच कंदाहार आणि त्यानंतर १९९६ ला काबूलवर कब्जा केला.

तालिबानने कट्टर इस्लामीक राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने कठोर निर्बंध लादले. संगीत आणि टीव्हीवर बंदी, मुलींच्या शाळांवर बंदी, महिलांना पूर्णपणे शरीर झाकूनच बाहेर पडण्याची अट असे निर्बंध लादण्यात आले. ओसामा अमेरिकेवर हल्ल्याचं नियोजन करत असताना त्याला तालिबानने मदत केली होती.

तालिबानने जेव्हा ओसामा बिन लादेनला आपल्या स्वाधिन करण्याची अमेरिकेची मागणी फेटाळली तेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये घुसून तालिबानची सत्ता उलथवून टाकली.

मुल्ला ओमरसह काही संस्थापक सदस्यांना शेजारी पाकिस्तानमध्ये जागा तर मिळाली. पण त्यांनी अस्तित्वासाठी लढाई सुरुच ठेवली.

फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये एक ऐतिहासिक करार झाला, ज्यानुसार अमेरिकेने पुढील १४ महिन्यात आपलं सैन्य काढून घेणार असल्याचं जाहीर केलं.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...