Thursday, 5 May 2022

विजयनगर व बहमनी राज्ये

Mpsc History
विजयनगर व बहमनी राज्ये:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1. विजयनगरचे साम्राज्य :-

दिल्लीच्या सुलतान महंमद तुघलकच्या संशयित स्वभावामुळे प्रांताधिकारी नाराज झाले. या घटनेमुळे तुघलक साम्राज्याचा विघटनास सुरवात झाली.
या विघटनामधूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली.
सन 1336 मध्ये हरीहर आणि बुक्का या दोन भावांनी दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य स्थापित केले. हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होत

विजयनगर साम्राज्याचे राजे :-

विजयनगर साम्राज्यात खालील पराक्रमी राजे होवून गेले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

हरीहर व बुक्का :-

हे दोन्ही बंधु पराक्रमी होते. त्यांनी दक्षिणेत तुंगभद्रा नदीपासून तेकेरळपर्यंतचा भाग आपल्या अधिकाराखाली आणला.
त्यानंतर आलेल्या बुक्काने रामेश्वरपर्यंत विजयनगर साम्राज्याचा विस्तार केला.
त्यानंतरच्या काळात त्यांना बरीचशी वर्षे बहमनी साम्राज्यासोबत संघर्ष कारअवी लागली.

कृष्णदेवराय :-

कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात पराक्रमी राजा होवून गेला.
त्याने ओडिशाच्या राजाचा पराभव करून विजयवाडा आणि राजमेहंद्रीचा प्रदेश आपल्या राज्यात सामील केला.

या राज्याच्या काळात विजयनगरचे साम्राज्य दक्षिणेस हिंद महासागरापर्यंत आणि उत्तरेस रायचूर पर्यंत पसरले होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

विजयनगर साम्राज्याच्या सांस्कृतिक विकास :-

विजयनगरचे राजे कला व साहित्याचे भोक्ते होते. तेलंगू भाषेतील साहित्याचा विकास यांच्याच काळात झाला.
आमुक्तमाल्यदा हा तेलंगू ग्रथ यांच्याच काळात निर्माण झाला.

विजयनगरमधील हजार राम मंदिर आणि पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर याच काळात बांधल्या गेले.
तालिकोटची लढाई (सन 1565) :-

कृष्णदेवरायनंतर विजयनगरच्या साम्राज्याला उतरली कळा लागली. सन 1565 मध्ये कर्नाटकच्या तालीकोट येथे विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निझामशाही, गोवळकोंड्यांची कुतूबशाही आणि बिरुदची बिरुदशाही या चारही सत्तेने एकत्र येवून विजयनगरच्या राजा रामरामराचा पराभव केला आणि हंपी शहराचा विध्वंस केला.

आजही हंपी येथे असलेले उध्वस्त अवशेष विजयनगरच्या प्राचीन वैभवाची साक्ष देते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

2. बहमनी साम्राज्याची स्थापना –

महमंद-बिन-

तुघलकच्या संशयी स्वभावामुळे त्याच्या बर्‍यास सुभेदारांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. त्यापैकी हसन गंगू बहमनशाह एक होता.

त्याचे सन 1347 मध्ये स्वत:ला दौलताबाद येथे स्वत:चा राज्याभिषेक करून राजा म्हणून घोषित केले बहमनी वंशाची स्थापना केली.
हसन गंगूने सत्ता स्थापित केल्याबरोबर दौलताबादची राजधानी गुलबर्गा येथे नेली.
बहमनी वंशात खालील राजे होवून गेले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

हसन गंगू (1347 ते 1358) –

गंगू हसन या राजाने बहमनी वंशाची स्थापना केली.
मुहंमदशहा पहिला (1358 ते 1373) –

हा राजा कलेचा चाहता होता. गुलबर्गामधील शाही मशीद, व उस्मानाबादमधील शमशूद्दिनची कबर बांधली व प्रशासकीय सुधारणा केल्या.

या राजाला इजिप्तच्या खलिफाने दक्षिण भारताचा सुलतान अशी मान्यता दिली होती.
मुहंमदशहा दूसरा (1377 ते 1997) –

सन 1377 मध्ये महंमदशाह दूसरा सत्ताधीश झाला.
त्याला दक्षिणेचा ऑरिस्टॉटल असे म्हणतात आणि प्रसिद्ध इराणचा कवी हाफिज त्याच्या दरबारात होता.

फिरोजशहा (सन 1397 ते 1422) –

या काळात विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये सतत लढाया होत असे.

यानंतरच्या काळात बहमनी वंशामध्ये अहमदशहा (1422 ते 1435), अल्लाउद्दीन दुसरा (1435 ते 57) इत्यादि सुलतान होवून गेले.

याचा कार्यकाल विजयनगर साम्राज्याचा संघर्षात गेला.
हुमायू (1457 ते 1461) –

सन 1457 मध्ये महमुद गवान नावाचा वजीर बहमनी वंशामध्ये आला. त्यास हुमायूने आपला वजीर म्हणून नेमले. यानंतरच्या काळात सन 1481 पर्यंत बहमनी वंशाची राज्यकारभाराची सूत्रे महंमद गवानच्या हातात होती.

बहमनी राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रामध्ये विजापूर(आदिलशाही), अहमदनगरची (निझामशाही), गोवळकोडयांची (कुतुबशाही), बिदरची (बिदरशाही) आणि वर्‍हाडची (इमानशाही) ही पाच स्वतंत्र राज्ये उदयास आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment