Sunday, 1 May 2022

प्रल्हाद नरहर देशपांडे

प्रल्हाद नरहर देशपांडे

प्र.न. देशपांडे (१७ सप्टेंबर, १९३६:पंढरपूर, महाराष्ट्र - २७ मे, २००७) हे १९६९ ते १९९६ ह्या काळात विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे येथे इतिहासाचे अध्यापक, संशोधक व विभागप्रमुख होते. धुळे येथील इतिहासाचार्य वि.का.राजवाडे मंडळ या संस्थेचे ते चिटणीस होते. तसेच मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या संशोधक ह्या त्रैमासिकाचे संपादक होते.१९७१ साली त्यांनी 'मराठा फोर्ट्‌स' ह्या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. ते अनेक विद्यापीठांचे व संस्थांचे सदस्य होते. त्यांनी इतिहासविषयक १४ पुस्तके व २ कथासंग्रह लिहिले. अनेक इतिहास परिषदांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे.

प्र.न. देशपांडे

प्र.न. देशपांडे
जन्म नाव
प्रल्हाद नरहर देशपांडे
जन्म
१७ सप्टेंबर इ.स. १९३६
पंढरपूर
मृत्यू
२७ मे इ.स. २००७
शिक्षण
एम.ए., पीएच.डी.
राष्ट्रीयत्व
भारतीय
साहित्य प्रकार
इतिहास, कथालेखन
वडील
नरहर देशपांडे
देशपांडे यांनी वि.का.राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या २१ खंडी ग्रंथसंचाचे पुनःसंपादन करून ही पुस्तके ११ खंडांत परत प्रकाशित केली.

पुस्तके
संपादन करा
आज्ञापत्र
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०१ शिवकाल (मूळ खंड आठवा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०२ शिवकाल (मूळ खंड पंधरावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०३ शिवकाल (मूळ खंड १६, १७, १८), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०४ शिवकाल (मूळ खंड विसावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०५ शिवकाल (मूळ खंड एकविसावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०६ (मूळ खंड पहिला), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०७ (मूळ खंड ०२, ०५), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०८ शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड तिसरा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०९ शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड चौथा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १० शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड चौथा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ११ शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड सहावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांचा उदय आणि उत्कर्ष
महाराष्ट्र संस्कृती
स्वराज्याचे शिलेदार
रायगड दर्शन, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग मुंबई , १९८१ , १९९५
राजगड दर्शन, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग मुंबई , १९८१
छत्रपती शिवाजी महाराज, (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, २००२)
छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, राजवाडे संशोधन मंडळ धुळे, १९८३, २०१०

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...