Thursday, 5 May 2022

ब्राह्मो समाजाची उद्दिष्टे

📚 ब्राह्मो समाजाची उद्दिष्टे 📚

🖍  हिंदू धर्माचे शुद्धीकरण करुन भारतीय लोकांना खऱ्या धर्माच्या तत्त्वाची ओळख करुन देणे.

🖍  समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती नाहीशा करणे.

🖍  ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरील टीकेला व धर्मांतरास विरोध करणे आणि त्यांच्या धर्म प्रसार कार्यास शह देणे.

🖍  हिंदू धर्मात आणि समाजात सुधारणा घडवून आणणे.

  📚  ब्राह्मो समाजाचे तत्त्वज्ञान  📚

🖍  एकेश्वरवाद   : ईश्वर हा एकच असून तो निर्गुण, निराकार आहे. ईश्वर हा या अनंत जगाचा निर्माता व नियत्ता आहे. त्या निराकार अशा ईश्वराची उपासना करावी. ईश्वराच्या उपासनेसाठी कोणत्याही कर्मकांडाची जरुरी नाही.

🖍  मूर्तीपूजेस विरोध  : मूर्तीपूजेला विरोध केला. ईश्वराचे अस्तित्त्व मूर्तीत अथवा वस्तूत नसल्यामुळे मूर्तीपूजा करू नये.

🖍  बंधुत्त्वाची भावना : ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. म्हणून आपण सर्वजण एकमेकांचे बंधू आहोत.

🖍  अवतारवादास विरोध : ईश्वर हा निराकार असल्यामुळे तो साकार होऊ शकत नाही. त्यामुळे अवतारवादाची कल्पना भ्रामक व चुकीची आहे.

🖍  आत्म्याचे अमरत्त्व : आत्मा हा अमर असून तो आपल्या कृत्याबद्दल फक्त ईश्वरालाच जबाबदार असतो.

🖍  सर्व धर्मातील ऐक्य  : नीतीमत्ता, सदाचार, मानवाबद्दलचे प्रेम, भूतदया यामुळे विविध धर्मात ऐक्य निर्माण होते.
🖍  विश्वबंधुत्त्वावर श्रद्धा : ब्राह्मो समाज सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा आदर करतो. त्याची निंदा करत नाही. त्यामुळे विश्वबंधुत्वावर श्रद्धा आहे.

🖍  प्रेम, परोपकार, सेवा : धर्माचा खरा अर्थ प्रेम, परोपकार, सेवा असा आहे, हे गृहीत धरुन एकमेकांशी व्यवहार करावेत.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...