Tuesday 17 May 2022

लोकमान्य टिळक


टिऴकांना तुरुंगवास : - 1 

◾️1880/81 मध्ये कोल्हापूर संस्थानातील तत्कालीन परिस्थितीवर ‘केसरी’ व ‘मराठा’मध्ये काही लेख लिहिले होते.

◾️ते चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे लोकमान्य टिळक व आगरकर (अनुक्रमे ‘केसरी’ व ‘मराठा’चे संपादक) यांना 17 जुलै 1882 ला 101 दिवसांची साधी कैद झाली होती..

◾️ त्यावर आगरकरांनी लिहिलेले ’डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

  टिळकांना तुरुंगवास:- 2  

◾️1897 मध्ये प्लेगच्या साथीच्या वेळी सरकारने केलेल्या दडपशाहीच्या विरोधात पुण्यात चाफेकर बंधूंनी रँड या जुलमी अधिकार्‍याची  22 जूनला हत्या केली. .

◾️त्या संदर्भात ‘केसरी’त लोकमान्यांनी लिहिलेल्या दोन लेखांबद्दल ऑगस्ट 1897 मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला.

◾️या वेळी बॅरिस्टर दावर त्यांचे वकील होते. या खटल्यात त्यांना 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली.

◾️मुंबईत डोंगरी, भायखळा व पुण्यात येरवडा येथे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. .

◾️या शिक्षेत सरकारने 6 महिन्यांची सूट दिल्यामुळे 7 सप्टेंबर 1898 ला त्यांची सुटका झाली.

 टिळकांना तुरुंगवास:- 3 

◾️इंग्रज सरकारच्या दडपशाहीला जोर आला होता. त्याविरुद्ध टिळक ‘केसरी’त सातत्याने लिहीत होते.

◾️ एप्रिल 1908 मधे बंगालमधील बाँबस्फोटाच्या पार्श्वभूमीवर टिळकांनी लिहिलेल्या (देशाचे दुर्देव) दोन अग्रलेखांच्या मुद्द्यांवरून जून 1908 मध्ये त्यांना अटक झाली व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला.

◾️ काळाची चक्रे कशी फिरतात पाहा. 1897 मध्ये त्यांची बाजू लढवणारे बॅ. दावर आता न्यायमूर्ती झाले होते व त्यांच्यापुढे हा खटला चालणार होता.

◾️ यावेळी बॅ. जीना त्यांचे वकील होते.

◾️22 जुलैला खटल्याचा निकाल लागला. त्यांना दोषी ठरवण्यात येऊन 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment