पंडित जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते.
नेहरूजी यांना लहान मुलं खूप आवडत म्हणून त्यांना लहान मुलं नेहरूचाचा म्हणून ओळखायचे.
त्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असलेले व्यक्तिमत्व, त्याचं नाव आजही देशाच्या राजकारणात नेहमी घेतलं जात. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.
1 जन्म
2 शिक्षण
3 जीवन
4 राजकीय जीवन प्रवास
5 पंडित नेहरू यांचे कार्य
6 1935 चा कायदा
7 भारत छोडो आंदोलन
8 मृत्यू
जन्म ------------------
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे 14 नोव्हेंबर, 1889 रोजी झाला. पंडित नेहरू यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू व आईचे नाव स्वरूप राणी असे होते. यांना दोन बहिणी होत्या.
एक विजयालक्ष्मी आणि दुसरी कृष्णा पंडित असे त्यांची नावे होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे एक महान दृष्टी कठोर परिश्रम व प्रामाणिकपणा बौद्धिक शक्ती आणि देशप्रेम असलेले व्यक्ती होते.
शिक्षण -------------------
नेहरूजीं यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिक्षकांकडून झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला.
या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये परत भारतात आल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात सहभागी झाले. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांनी परकीय जुलुमी राजवटीखाली देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला.
जीवन ---------------
पंडित नेहरू यांच्या वयाच्या 15 व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे हॅरो येथे शिक्षणाकरता राहिले. त्यानंतर वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला.
1917 साली त्यांना इंदिरा प्रियदर्शनी ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचा 1931 साली मृत्यू झाला व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे 28 फेब्रुवारी, 1936 रोजी निधन झाले. पंडित नेहरू यांचे जीवन साधे आणि जगापेक्षा वेगळे होते.
काही लोक कदाचित त्याचे औचित्य सिद्ध करू शकत नाही. पण जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्रिमूर्ती भवनात राहत असेल, तेव्हा त्यांचे आयुष्य अगदी साधेपणाने जगले.
उन्हाळ्यात जेव्हा ते किशोर मूर्ती भवनात जेवणासाठी येत असेत, तेव्हा विश्रांतीसाठी ते इमारतीतल्या सोफ्यावर बसायचे त्या इमारतीत एयर कंडीशनर बसविण्यात आले होते;
परंतु तेथे येणाऱ्या अतिथीसाठी चालवले गेले. रात्रीचे जेवण झाल्यावर पंडित नेहरू त्यांच्या खोलीत जात असत. तिथे फक्त एक छत पंखा आणि एक टेबल फॅन असायचा, तो टेबल फॅन इतका आवाज करायचा की, त्याचा आवाज आजूबाजूच्या खोल्यांमध्ये पोहोचायचा.
राजकीय जीवन प्रवास --------------
विदेशात शिक्षण घेऊन भारतात परत आल्यानंतर पंडित नेहरू महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झाले व 1912 मध्ये भारतात त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू 1912 मध्ये झालेल्या बंकिपुर काँग्रेस अधिवेशनाला उपस्थित होते.
1919 मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादच्या अध्यक्ष सुद्धा बनले होते. 1916 मध्ये ते प्रथमच महात्मा गांधी यांना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. 1920 सली त्यांनी उत्तर प्रदेशाच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला.
1920-1922 दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. 1923 मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय कॉंग्रेस परिषदेचे सचिव बनले. 1916 मध्ये त्यांनी इटली, स्विझरलँड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया या देशांचा दौरा केला.
1928 मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करतांना त्यांना लाठी हल्ल्यांना सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय कॉंग्रेस सभेला ते उपस्थित होते.
1928 मध्ये त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. 1929 पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले व संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय असे त्यांनी तिथेच निश्चित केले. दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहामुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला.
14 फेब्रुवारी, 1935 रोजी त्यांनी उत्तर खंडामधील अल्मोडा तुरूंगामध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. 7 ऑगस्ट, 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी ‘भारत छोडो’ ही क्रांतिकारी घोषणा केली. पुढच्या दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले, ही त्यांची सर्वात शेवटची ठरली.
पंडित नेहरूंनी नऊ वेळा कारावास भोगला. 1945 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. 1940 मध्ये आग्नेय आशियाला जाऊन आले. त्यानंतर 6 जुलै, 1924 रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
पंडित नेहरू यांचे कार्य -----------------
पंडित नेहरू हे 1916 मध्ये महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून प्रेरित होऊन जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या वडिलांनी विदेशी वस्तूंचा त्याग केला व स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिले. ते खादीचा वापर करू लागले.
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहीला.
अनेक आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिका याबद्दल त्यांना 1955 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.
जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी नियोजन आयोग स्थापन केला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहित केले आणि सलग तीन पंचवार्षिक योजना सुरू केल्या. त्यांच्या धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगाचे नवे पर्व सुरू झाले.
भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विकासामध्ये नेहरूंची मोठी भूमिका होती. जवाहरलाल नेहरूंनी टिटो आणि नासेर यांच्यासोबत आशिया आणि आफ्रिकेत वसाहतवादाच्या निर्मूलनासाठी एकत्रितरित्या चळवळ उभी केली.
1935 चा कायदा -------------------
जेव्हा ब्रिटीश सरकारने 1935 अधिनियमचा कायदा लागू केला तेव्हा कॉग्रेस पक्षाने निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला.
नेहरू निवडणुकीपासून दूर राहिले परंतु त्यांनी पक्षासाठी देशभर जोरदार प्रचार केला. कॉग्रेसने जवळजवळ प्रत्येक प्रांतात सरकारे स्थापन केली आणि मध्यवर्ती विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकल्या.
नेहरू कॉग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले आणि गांधीजीनंतर राष्ट्रवादी चळवळीतील ते दुसरे मोठे नेते झाले.
भारत छोडो आंदोलन ----------_--
1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलना-दरम्यान त्यांना अटकही झाली होती आणि 1945 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली होती. 1947 मध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या विभाजन आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर ब्रिटीश सरकारशी झालेल्या वाटाघाटीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
1947 मध्ये ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पाकिस्तानसह नवीन सीमेवर मोठ्या प्रमाणात स्थलांतर आणि दंगली, सुमारे 500 राज्ये भारतीय संघटनेत एकत्रित करणे, नवीन राज्यघटना तयार करणे, संसदीय लोकशाहीसाठी राजकीय व प्रशासकीय चौकट स्थापणे यासारख्या भयंकर आव्हानांना त्यांनी प्रभावीपणे सामना केला.
जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी नियोजन आयोग स्थापन केला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहित केले. त्यांच्या धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगाचे नवे पर्व सुरू झाले. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विकासामध्ये नेहरूंची मोठी भूमिका होती. जवाहरलाल नेहरूंनी टिटो आणि नासेर यांच्या सोबत आशिया आणि आफ्रिकेत वसाहतवादाच्या निर्मूलनासाठी एकत्रितरित्या चळवळ उभी केली.
कोरियन युद्ध संपविणे, सुएझ कालव्यावरील वाद मिटविणे आणि कॉंगो करारासाठी भारताच्या सेवा आणि आंतरराष्ट्रीय पोलिसिंग यासारख्या इतर आंतरराष्ट्रीय समस्यांचे निराकरण करण्यात त्यांनी मध्यस्थ म्हणून काम केले.
पश्चिम बर्लिन, ऑस्ट्रिया आणि लाओस यासारख्या अन्य महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी पडद्यामागील महत्त्वपूर्ण योगदान दिले.
मृत्यू ---------------
पंडित जवारलाल नेहरू यांचे निधन 27 मे 1964 रोजी झाले. त्यांची समाधी स्थळ हे दिल्लीतील शांतीवन येथे आहे.
No comments:
Post a Comment