Tuesday 3 May 2022

भेडा घाट व व्यापारी वाऱ्यांची वैशिष्टये आणि व्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार

❇️ भेडा घाट ❇️

❇️ आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता.

❇️ मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून मध्य नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृष्य फार मनोवेधक असते.

===========================
महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
🌬 व्यापारी वाऱ्यांची वैशिष्टये 🌬

❇️ हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात. सागरी प्रदेशातून हे वारे नियमितपणे व वेगाने वाहतात

❇️ खंडांतर्गत प्रदेशात हे वारे त्या मानाने संथगतीने वाहतात.

❇️ व्यापारी वाऱ्यांचा वेग ताशी सुमारे १६ ते २४ कि.मी. असतो.

❇️ व्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून वाहतात, म्हणून हे उष्ण असतात

===============================

🌬 व्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार  🌬

1] उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे

                उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नर्गन्येकडे वाहत असल्याने यांना 'ईशान्य व्यापारी वारे असे म्हणतात.

2] दक्षिण गोलार्धातील आग्रेय व्यापारी वारे

          दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत असल्याने यांना 'आग्नेय व्यापारी वारे' असे म्हणतात.

===========================

No comments:

Post a Comment