👉 या निर्देशांकात भारत 46 व्या क्रमांकावर आहे
✔️ विशेष निरीक्षण :-
या वर्षीच्या अहवालात असे दिसून आले आहे की लोकशाहीने 2010 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घसरण अनुभवली आहे
💥 निर्देशांक जाहीर करणारी संस्था :-
इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट ( Economic Intelligence Unit )
🟢 2006 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो.
🟢 भारताचा क्रमांक :- 46 🟢
( 5 अंकांनी सुधारणा )
मागील वर्षी 51 वा क्रमांक होता
✔️ इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट लोकशाही निर्देशांक मोजमाप पद्धत :-
- लोकशाही निर्देशांक 60 निर्देशकांवर आधारित आहे
✔️ पाच श्रेणींमध्ये विभाजन केले आहेत :-
1) निवडणूक प्रक्रिया आणि बहुलवाद
2) नागरी स्वातंत्र्य
3)सरकारचे कार्य
4)राजकीय सहभाग
5) राजकीय संस्कृती .
🟢 सहभागी देशांना शून्य ते दहा अंकामध्ये रेटिंग दिले जाते
🟢 एकूण अनुक्रमणिका पाच एकूण श्रेणी गुणांची सरासरी असते.
प्रत्येक देशाला त्यांच्या सरासरी गुणांच्या आधारे चार प्रकारच्या शासनांमध्ये वर्गीकृत केले जाते :-
1) पूर्ण लोकशाही
2) सदोष लोकशाही
3) संकरित शासन
4) हुकूमशाही शासन
No comments:
Post a Comment