🔹भारतीय विमानावर का असते ‘VT’ ?
◾️विमानाने प्रवास करणे कोणाला नाही आवडत? आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा, असे प्रत्येकाला वाटते, असो. विमान हे प्रत्यक्षात किंवा व्हिडिओमध्ये तर सर्वानीच पाहिले असेल यात शंका नाही. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का या गोष्टीबद्दल. ती म्हणजे…
भारतीय विमानावर ‘VT’ का असते?👇🏻👇🏻
VT चा अर्थ आहे ‘व्हॉईसरॉय टेरिटरि’ (Viceroy’s territory) म्हणजे व्हॉईसरॉयचा इलाखा होय. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो असलो तरी काही गोष्टी आपण तशाच ठेवल्या आहेत. यातीलच हा एक प्रकार म्हणजे VT हा कोड होय. 1929 मध्ये आपल्याला ही संज्ञा मिळाली आणि आजही आपण तीच वापरत आहोत. ही संज्ञा आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे मिळते. भारतात ब्रिटिश आमलात जेव्हा विमान सेवा सुरू झाली तेव्हा तो कोड भारतीय विमानांना मिळाला. पुढे भारत स्वतंत्र झाला पण भारताला वापरता येतील असे कोड उपलब्ध नव्हते.
◾️इंडिया (IN), भारत (BH), हिंदुस्थान (HI) यापैकी कोणताच कोड उपलब्ध नव्हता. कारण त्यातील ‘बी’ सिरीज चीन ला आणि ‘आय’ची सिरीज इटलीला दिली गेली होती. भारताला व्ही आणि एक्स असे दोन कोड उपलब्ध होते. परंतु ते काही घेण्यासारखे वाटले नाहीत. यामुळे भारतीय विमानांना VT हाच कोड ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. मात्र काही देशांनी नंतर आपले कोड बदलेही आहेत.
No comments:
Post a Comment