1.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा किंवा विचार-विनिमय करण्याचा अधिकार आहे?
A) कलम 124 B) कलम 130 C) कलम 143 D) कलम 147
उत्तर – कलम 143
2. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्र संबंधी योग्य विधाने ओळखा.
अ) संसद न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात केवळ वाढ करू शकते मात्र घट घडवू शकत नाही.
ब) भारताचे सर्वोच्च न्यायालय अमेरिकन न्यायालयात प्रमाणे फेडरल कोर्ट म्हणून कार्य करते.
क) ब्रिटिश न्यायालयाचा प्रमाणे अपिलाचे अंतिम न्यायालयाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.
A) अ आणि ब
B) अ आणि क
C) अ ब आणि क
D) ब आणि क
उत्तर – अ, ब आणि क
3. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयांचे कार्य स्थान त्यांच्या राजधानीच्या शहरात नाही?
अ) उत्तर प्रदेश ब) मध्य प्रदेश
क) छत्तीसगड ड) सिक्किम
A) अ आणि ब
B) क आणि ड
C) अ,ब आणि क
D) अ ब आणि ड
उत्तर – अ ब आणि क
४.भारतीय राज्यघटनेच्या ह्या कलमानुसार दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.
A) कलम 214 B) कलम 226 C) कलम 230 D)कलम 231
उत्तर – कलम 231
५. गावातील अनुभवी ज्येष्ठांकडून तक्रार निवारणाच्या भारतातील पारंपरिक व्यवस्थेची सुधारित व गांधीवादी तत्त्वावर आधारित व्यवस्था म्हणजे काय?
A) लोकायुक्त B) लोक अदालत
C) लोकपाल D) कौटुंबिक न्यायालय
उत्तर – लोकअदालत
६. राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ)कॅबिनेट ने केवळ लेखी स्वरुपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात.
ब) अशी तरतूद घटनेत 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली.
A) फक्त अ
B) फक्त ब
C) अ,ब
D) वरीलपैकी एकही नाही
उत्तर – फक्त अ
७. उच्च न्यायालयाच्या त्या खालच्या न्यायालया वरील प्रशासकीय नियंत्रणात कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
A) नेमणुका
B) निवृत्ती वेतन
C) बदली
D) सक्तीची निवृत्ती
उत्तर – निवृत्तीवेतन
८.73 व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबद्दल च्या कोणत्या तरतुदी राज्यसरकार साठी ऐच्छिक आहेत?
अ) दोन-तीन स्तरीय रचना ब) निश्चित कार्यकाळ
क) ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती ड) जिल्हा नियोजन समिती
A) क आणि ड
B) अ आणि ब
C) ब आणि ड
D) अ आणि क
उत्तर – क आणि ड
९.केंद्रीय निवडणूक आयोगा संबंधित अयोग्य विधान ओळखा.
अ) याला अखिल भारतीय स्वरूप आहे
ब)देशात मुक्त व न्याय निवडणुका घेणे हेतू आहे.
क) राष्ट्रपती किंवा राज्यपाल आयोगास त्यांच्या मागणीनुसार स्टाफ उपलब्ध करून देते.
ड)राज्यपाल आयोगास मदत करण्यासाठी प्रादेशिक आयुक्त नेमू शकतात.
पर्यायी उत्तरे
A) अ , ब
B) ड
C) अ
D) अ ब क ड
उत्तर – ड
१०. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते?
A) राज्यपाल B) संसद C) विधिमंडळ D) राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्रपती
उत्तर – विधिमंडळ
११. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे?
A) कलम 165 B) कलम 166 C) कलम 164 D) कलम 76
उत्तर – कलम 165
१२.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात उच्च न्यायालय व कनिष्ठ न्यायव्यवस्था यांच्या संदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत?
A) भाग 4 B) भाग 5 C) भाग 6 D) भाग 7
उत्तर – भाग 6
१३.न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत पुढील विधाने विचारात घ्या.
अ)केवळ संसदीय व राज्य विधिमंडळाचे कायदे नव्हे तर शासकीय कार्यकारी आदेशाची ही तपासणी करणे न्यायिक पुनर्विलोकन याच्या साह्याने शक्य आहे.
ब)राज्यघटनेच्या तत्वांचे चुकीच्या कायद्यापासून संरक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट आहे.
A) फक्त अ बरोबर
B) फक्त ब बरोबर
C) दोन्ही बरोबर
D) दोन्ही चूक
उत्तर – दोन्ही बरोबर
१४. खालील विधाने विचारात घ्या.
अ) राज्य विधिमंडळाचे कायदे केवळ राज्याच्या परिक्षेत्रा साठीच लागू असतात
ब) संसदेचे कायदे भारतीय नागरिकांच्या परदेशातील संपत्तीला लागू असतात वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
A) फक्त अ
B) फक्त ब
C) अ आणि ब
D) वरीलपैकी नाही
उत्तर – अ आणि ब
१५.आदिवासी क्षेत्रांना संसदीय कायदा लागू होणार नाही असे निर्देश देण्याचे अधिकार अनुक्रमे कोणाला आहेत?
A) राष्ट्रपती, राज्यपाल
B) राज्यपाल, राष्ट्रपती
C) केवळ राज्यपाल
D) पंतप्रधान, राष्ट्रपती
उत्तर – राज्यपाल राष्ट्रपती
१६. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या परिशिष्टात केंद्र व राज्यांच्या कायदेविषयक विषयांची विभागणी दिलेली आहे?
A) परिशिष्ट 4 B) परिशिष्ट 2
C) परिशिष्ट 7 D) परिशिष्ट 8
उत्तर – परिशिष्ट 7
17. शेषाधिकार संबंधित खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय घटनेत शेषाधिकार याची तरतूद ऑस्ट्रेलियन घटनेवरून घेतली आहे.
ब) भारतात असे शेषाधिकार यांचे अधिकार संसदेस आहेत.
क) स्वित्झर्लंड मध्ये शेषाधिकार केंद्राकडे आहेत.
ड) स्पेनमध्ये शेषाधिकार केंद्र व राज्य दोघांकडेही आहेत.
A) वरील सर्व योग्य
B) केवळ ब योग्य
C) ब आणि ड योग्य
D) ब आणि क योग्य
उत्तर ब आणि ड योग्य
18. भारतीय निवडणूक आयोगामार्फत खालीलपैकी कोणत्या निवडणुका घेतल्या जातात?
अ) भारताचा राष्ट्रपती ब) भारताचे उपराष्ट्रपती
क) संसद ड) राज्यविधी मंडळ
इ) नगरपालिका
A) अ,ब,क, इ
B) ब,क,ड
C) अ,क,ड
D) अ,ब,क,ड
उत्तर – अ, ब,क,ड
१९.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांना हस्तक्षेपास मनाई आहे?
A) कलम 326 B) कलम 328
C) कलम 329 D) कलम 330
उत्तर – कलम 329
२०. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष तसेच सदस्यांच्या सेवाशर्ती ठरवण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?
A) संघ लोकसेवा आयोग B) संसद
C) राष्ट्रपती D) वरीलपैकी नाही
उत्तर – राष्ट्रपती
२१. राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल कोणास सादर करतो?
A) संबंधित राज्याचे राज्यपाल
B) संबंधित राज्याचे विधिमंडळ
C) संबंधित राज्याचे मुख्यमंत्री
D) संबंधित राज्याचे विधिमंडळ अध्यक्ष
उत्तर – संबंधित राज्याचे राज्यपाल
२२. राज्याच्या कार्यकारी विभागात कोणाचा समावेश होतो?
अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री मंत्रिमंडळ
क) महाधिवक्ता ड) विधानसभा अध्यक्ष
A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ, ब, आणि क
D) अ,ब,क,ड
उत्तर – D. अबकड
२३. भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयी ची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे?
A) अमेरिका B) ब्रिटन
C) कॅनडा D) ऑस्ट्रेलिया
उत्तर – कॅनडा
२४.कोणत्या घटना दुरुस्तीने दोन किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची तरतूद संविधानात केली?
A) चौथी घटनादुरुस्ती
B) सहावी घटनादुरुस्ती
C) सातवी घटना दुरुस्ती
D) आठवी घटनादुरुस्ती
उत्तर 7 वी घटना दुरुस्ती
२५. 73 व्या घटनादुरुस्तीने कायद्यातील कोणत्या कलमाला मूर्त स्वरूप दिले?
A) कलम 19
B) कलम 40
C) कलम 45
D) कलम 21
उत्तर – कलम 40
२६. पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात?
A) विभागीय आयुक्त
B) जिल्हाधिकारी
C) पंचायत समितीचा उपसभापती
D) जिल्हा परिषदेचा अध्यक्ष
उत्तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष
२७. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50 टक्के आरक्षण कधी मिळाले?
A) 2000
B) 2005
C) 2007
D)2011
उत्तर – 2011
28. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला?
A) अशोक राव मेहता समिती
B) एल एम सिंघवी समिती
C) दिनेश गोस्वामी समिती
D) ताखत्मल जैन समिती
उत्तर एम सिंघवी समिती
No comments:
Post a Comment