Sunday, 17 April 2022

भारतीय राज्यघटना – Indian Polity

भारतीय राज्यघटना – Indian Polity

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ४४८ (जानेवारी २०२०) कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वांत मोठे संविधान आहे. भारताची राज्यघटना ही अतिशय लवचीक असून तिच्या मदतीने जगातील इत्तर राज्यघटनांपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.

भारतीय राज्यघटना : घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये , केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत ग्क्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे
भाग I कलम १ ते ४ संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
भाग II कलम ५ ते ११ नागरिकत्व
भाग III कलम १२ ते ३५ मूलभूत हक्क
भाग IV कलम ३६ ते ५१ राज्याचे मार्गदर्शक तत्वे
भाग IVA कलम ५१ A मूलभूत कर्त्यव्ये
भाग V कलम ५२ ते १५१ केंद्र सरकार (संघराज्य)
भाग VI कलम १५२ ते २३७ राज्य सरकार
भाग VII 7 वी घटनादुरुस्ती रद्द
भाग VIII कलम२३९-२४२ केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
भाग IX कलम २४३-२४३O पंचायतराज
– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद
– नगर पंचायत
भाग IX A कलम २४३P – २४३ZG नगरपालिका
भाग IX B कलम ZH – कलम ZT सहकारी संस्था
भाग X कलम २४४-२४४A अनुसूचित जाती व जमातीप्रदेश /क्षेत्र, आदिवासी क्षेञ
भाग XI कलम २४५ – २६३ संघ-राज्य संबंध
भाग XII कलम २६४-३००A महसुल – वित्त, मालमत्ता, करार व फिर्याद
भाग XIII कलम ३०१-३०७ व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
भाग XIV कलम ३०८-३२३ केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा, प्रशासकीय लोकसेवा आयोग
भाग XIV A कलम ३२३A, ३२३B न्यायाधिकरणे
भाग XV कलम ३२४-३२९A निवडणुका
भाग XVI कलम ३३०-३४२ अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
भाग XVII कलम ३४३-३५१ कार्यालयीन भाषा
भाग XVIIII कलम ३५२-३६० आणीबाणी विषयक तरतुदी
भाग XIX कलम ३६१-३६७ संकीर्ण
भाग XX कलम ३६८ संविधान दुरुस्ती बाबत (घटनादुरूस्ती तरतुदी)
भाग XXI कलम ३६९-३९२ अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष तरतुदी
भाग XXII कलम ३९३-३९५ संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
भारतीय राज्यघटना – एकूण २२ भाग

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...