Sunday, 24 April 2022

Imp gk

💐 रूपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?
🎈शेरशहा सुरी.

💐 नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈दिल्ली.

💐 सध्या राष्ट्रीय उत्पन्नाचे आधारवर्ष कोणते आहे ?
🎈सन २०११- २०१२.

💐 औद्योगिकीकरणाबाबत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?
🎈दुसरा.

💐 आयात-निर्यात बॅंकेचे मुख्य कार्य कोणते ?
🎈आयात-निर्यात व्यापाराला कर्जपुरवठा करणे.

💐 सिंधू संस्कृतीत कोणती पद्धती अस्तित्वात होती ?
🎈मातृसत्ताक पद्धती.

💐 पल्लव घराण्याचा संस्थापक कोण होता ?
🎈सिंहविष्णू.

💐 छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण किल्ले किती ?
🎈३७० किल्ले.

💐 बौद्ध धर्माची पहिली धर्मपरिषद महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली कोठे भरली होती ?
🎈राजगीर. ( राजगृह )

💐 भारतापासून ब्रम्हदेशाचा कारभार वेगळा करावा,अशी शिफारस कोणत्या कमिशन-
ने केली होती ?
🎈सायमन कमिशन.

💐 दुध कोणत्या घटक द्रव्यामुळे गोड लागते ?
🎈लॅक्टोज.

💐 अनुवांशिकता व गुण सातत्याची माहिती कशात सामावलेली असते ?
🎈डी.एन.ए.

💐 'ब' जीवनसत्व एकूण बारा प्रकारची आहेत.त्यांना काय म्हणतात ?
🎈बी-काॅम्लेक्स.

💐 'मधुमेह' झालेल्या रोगास कोणते औषध दिले जाते ?
🎈इन्स्युलिन.

💐 हवेच्या प्रदुषणामुळे अलीकडे कोणत्या रोगाचे प्रमाण वाढले आहे ?
🎈फुफ्फुसांचा कर्करोग.

💐तंबाखूमध्ये आढळणारे विषारी द्रव्य कोणते ?
🎈निकोटीन.

💐 चहामध्ये कोणते अपायकारक द्रव्य असते ?
🎈टॅनिन.

💐 वनस्पतीमध्ये असलेला महत्त्वाचा घटक कोणता ?
🎈सेल्युलोज.

💐 झाडांची पाने कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे पिवळी पडतात ?
🎈नायट्रोजन.

💐 निलगिरीचे शास्ञीय नाव काय आहे ?
🎈युकाॅलिप्टस

No comments:

Post a Comment