०७ एप्रिल २०२२

हृदय (Heart

.            🎇 हृदय (Heart) 🎇

🔰 स्थान : मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.

🔰वजन :

पुरुष – ३४० ग्रॅम्स

स्त्री – २५५ ग्रॅम्स

🔰हृदयाचे कार्य :

◾️ हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.

◾️ हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.

◾️ हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...