Tuesday 5 April 2022

संसर्गाच्या प्रसारावर देखरेख ठेवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे नवे तंत्रज्ञान ‘मॉडेल'. आणि तेजस FOC विमान भारतीय हवाई दलात सामील

⚡️ भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेची सज्जता आणि इतर उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून ‘कोविड-19 इंडियन नॅशनल सुपर मॉडेल’ उपक्रम राबवत आहे.

⚡️सरकार संसर्ग क्षमता आणि जीवितहानीवर बारीक लक्ष ठेवून आहे, परंतु रोगावरील देखरेख वाढवण्यासाठी तसेच प्रसाराचा अंदाज वर्तवण्यासाठी एक मजबूत पूर्वसूचना प्रणाली तयार करणे अत्यावश्यक आहे. कोविड-19 संबंधी अंदाज आणि देखरेखीसाठी  असंख्य गणितीय मॉडेलची DST-SERB (विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ) आणि अन्य संस्थांद्वारे प्रायोजित विश्लेषकांकडून चाचपणी केली जात आहे.

☄ ठळक बाबी.. ☄

⚡️ हवामानविषयक घटनांच्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी गणितीय मॉडेल्सचा वापर भारत पूर्वीपासून करीत आहे. त्यातून प्रेरणा घेत विभागाने या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा शोध घेण्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी एक मॉडेल तयार करण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे, जो पुरावा-आधारित अंदाजासाठी आवश्यक





तेजस FOC विमान भारतीय हवाई दलात सामील 🛩

👉 कोयंबटूर (तामिळनाडू) या शहराजवळ भारतीय हवाई दलाच्या (IAF) सुलूर हवाई तळावर ‘तेजस एमके-1’ या विमानांचा भारताच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यामध्ये 27 मे 2020 रोजी समावेश करण्यात आला. अशा पद्धतीच्या लढाऊ विमानांचा समावेश ताफ्यामध्ये करणारे भारतीय हवाई दलाचे हे पहिले स्क्वाड्रन आहे.

👉 सुलूर हवाई तळामधल्या ‘फ्लाईंग बुलेट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘नंबर 18 स्क्वाड्रन’चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

👉 तेजसच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाने परिचालन क्षमता वृद्धीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. तेजस एमके-1 मुळे देशाच्या स्वदेशी लढावू विमान बांधणी कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही प्रोत्साहन मिळणार आहे.

👉 ‘तेजस एमके-1 FOC’ हे चौथ्या पिढीचे ‘तेजस’ विमान आहे. यामध्ये एकच इंजिन आहे. तसेच ते वजनानी हलके, अतिशय चपळाईने कार्यरत राहू शकते. तसेच सर्वप्रकारच्या हवामान परिस्थितीत बहुविध भूमिका पार पाडणारे हे लढाऊ विमान आहे. तेजसमध्ये हवेतल्या हवेमध्येच इंधन भरण्याची सुविधा-क्षमता आहे.

No comments:

Post a Comment