Saturday, 23 April 2022

वाचा :- महत्वाच्या शासकीय योजना आणि काही प्रश्न


♻️  वाचा :- महत्वाच्या शासकीय योजना

◆ *वंदे भारत मिशन* - कारोणामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमानाची व्यवस्था..

◆ *कुपोशित मा अभियान* - गर्भवती महिला व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी अभियान..

◆ हिमाचल प्रदेश सरकारची ग्रामीण भागातील वृद्धांसाठी  *'पंचवटी' नावाची योजना..*
प्रत्येक विकास खंडात  बागांची निर्मिती करण्यात येणार आहे, ही निर्मिती मनेरगा च्या अंतर्गत करण्यात येणार आहे.

◆ *अरुणवोदय योजना* - आसाम सरकारची आहे.
या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यावर मासिक 830 रुपये मदत पाठवली जाणार आहे.

◆ *आंध्र प्रदेश सरकारचा नेडू - नेडू कार्यक्रम...*
या अंतर्गत सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा मध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याच्या उद्देशाने.

◆ भारतीय रेल्वेने महिलेच्या सुरक्षितेसाठी *'मेरी सहेली' नावाचा उपक्रम* सुरू केला आहे.

___________________________________

काही प्रश्न

📚कोणत्या कंपनीने स्टार्टअप कंपन्यांना समर्थन देवून त्यांची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने "AI इनोव्हेट प्रोग्राम" नावाने एका कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
(A) गुगल
(B) आयबीएम
(C) डेल
(D) मायक्रोसॉफ्ट✅

📚कोणत्या संस्थेच्यावतीने ‘NPCI टोकनायझेशन सिस्टीम (NTS)’ सादर करण्यात आली?
(A) भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ✅
(B) भारतीय माहिती सुरक्षा परिषद
(C) A आणि B
(D) यापैकी नाही

📚कोणत्या राज्य सरकारने सरकारी कामकाजासाठी ‘भास्करब्दा चंद्र-सौर दिनदर्शिका’ याचा उपयोग केला जाणार असल्याविषयीची घोषणा केली?
(A) आसाम✅
(B) बिहार
(C) कर्नाटक
(D) केरळ

📚केंद्रीय सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) यात _ वाढ सरकारने मंजूर केली.
(A) 4 टक्के
(B) 3 टक्के✅
(C) 2 टक्के
(D) 1 टक्का

📚INSACOG हा __ अंतर्गत स्थापन करण्यात आलेला एक मंच आहे.
(A) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
(B) आयुष मंत्रालय
(C) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय✅
(D) कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

📚कोणत्या राज्यातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले?
(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश✅
(C) गुजरात
(D) उत्तराखंड

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...