Wednesday, 13 April 2022

भारताचा स्वातंत्र्यलढा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

भारताचा स्वातंत्र्यलढा.....

1857 ची लढाई

भारताचा स्वातंत्र्यलढा ही भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंग्डमचे आधिपत्य घालवून स्वतंत्र, स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवाद रुजविला.इ.स. १७५७ ते इ.स.१८५७ असा हा प्रदीर्घ काळ होता. त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले. इ.स, १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर पुन्हा इ.स.१९४७ सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केलेला आहे. जगातील सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आहेत. या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अंतिमतः; भारताला स्वातंत्र्य मिळाले.



ऐतिहासिक पार्श्वभूमी ....

पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला.[२] व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले.त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला.[३] इ.स.१८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व भारतात प्रस्थापित केले होते.[४] त्या जोरावर १८ व्या शतकातही ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...