Wednesday, 27 April 2022

सौर वाळवणी यंत्र

सौर वाळवणी यंत्र

सौर वाळवणी यंत्र हे नाशवंत शेतीमाल (भाज्या, फळे, धान्ये) दीर्घ काळ टिकवता येण्यासाठी निर्जलीकरण करणारे यंत्र होय. सोलर ड्रायरचे अनेक प्रकार असले तरी पदार्थातील पाणी काढून घेणे हे त्यांचे मूलभूत काम असते.

Solar Dryer in vigyan ashram

dryer in vigyan ashram

solar dryer with description
निर्जलीकरणाचे फायदे संपादन करा
बुरशीजन्य सुक्ष्मजीवा पासून शेतीमालाचे रक्षण होते व त्यामुळे तो दीर्घ काळ टिकवता येतो
शेतीमालाच्या वजनात व आकारात घट होते व त्यामुळे, त्यावर होणार्या वाहतूक व साठवणूकी वरील खर्चात बचत होते
सोलर ड्रायरचे फायदे संपादन करा
वीजे वर किंवा इतर इंधनावर चालणार्या ड्रायर पेक्षा सोलर ड्रायर हा खूपच किफायतशीर असतो
बांबू पासून बनविलेला सोलर ड्रायर हा ड्रायरचा अतिशय साधा प्रकार आहे . या मध्ये ड्रायींग चेंबर व कलेक्टर एकत्रच असल्यामुळे बनविण्याचा सुरुवातीचा खर्च कमी असतो
सोलर ड्रायरमुळे वाळविण्यासाठी ठेवलेल्या पदार्थाचे वारा, धूळ,माती ह्यापासून संरक्षण होते
बाजारात उपलब्ध असणारे ग्रीन हाउस सोलर ड्रायर हे बांबू पासून बनविलेल्या सोलर ड्रायर पेक्षा जास्त चांगल्या कार्यक्षमतेचे असतात व ते मुख्यत्वे फळं, मासे, कॉफी असे खाद्य पदार्थ वाळविण्यासाठी वापरतात कारण अशा पदार्थांचे वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे
सोलर टनेल ड्रायर संपादन करा
सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कँडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता १०० किलो एवढी आहे.

सोलर टनेल ड्रायर अर्धदंडगोलाकार, ३ x ६ मीटर आकाराचा आहे. याची उंची दोन मीटर आहे.
२५ मि.मी. आकाराचे लोखंडी पाइप अर्धगोलाकार आकारात वाकवून सोलर टनेल ड्रायर तयार केला आहे.
टनेल ड्रायरचा जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटचा बनविलेला आहे, त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो, तसेच उत्तर दिशेला आतून नॉर्थ वॉल बसविलेली आहे.
अर्धगोलाकार पाइपवर अल्ट्रा व्हायोलेट पॉलिथिलीन फिल्म (२०० मायक्रॉन जाडी) झाकलेली आहे.
सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा "ग्रीन हाऊस इफेक्‍ट'मुळे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी ते ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते.
वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला/ फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो.
ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आर्द्रता लवकरात लवकर कमी होते, पदार्थ सुकण्यास मदत होते.
या ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. बाहेरपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...