Thursday, 14 April 2022

उठावाची कारणे

उठावाची कारणे

बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

१८५७चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक)
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...