Wednesday, 27 April 2022

अमरावती भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर

अमरावती
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर.

हा लेख अमरावती शहराविषयी आहे. अमरावती जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

हा लेख अमरावती शहराविषयी आहे. अमरावती तालुक्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
thumb|अमरावती शहराचे एक दृश्य

  ?अमरावती

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: अंबानगरी
—  शहर  —
Wikimedia | © OpenStreetMap
२०° ५६′ ००″ N, ७७° ४५′ ००″ E

ओपनस्ट्रीट मॅप गूगल अर्थ प्रोक्सिमिटीरामा
प्रमाणवेळ
भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची
८५.१४ चौ. किमी
• ६५६.५४ मी
जिल्हा
अमरावती
लोकसंख्या
• घनता
लिंग गुणोत्तर
६,४६,८०१[१] (२०११)
• ७,५९७/किमी२
त्रुटि: "१०००:९५७" अयोग्य अंक आहे ♂/♀
कोड
• दूरध्वनी
• आरटीओ कोड

• +०७२१
• MH-27
Empty citation (सहाय्य)
अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते. विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण मंदिरे आहेत.

१९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "खाजगी जकात " म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६४६,८०१ इतकी आहे. त्यापैकी ३३०,५४४ पुरुष व ३१६,२५७ महिला आहेत. अमरावती शहरातील लिंग गुणोत्तर १०००:९५७ आहे.

नाव संपादन करा
अमरावतीAmravati.ogg उच्चारण (सहाय्य·माहिती) हे शहर अमरावती जिल्हा तसेच अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव इंद्र याची नगरी / राजधानी असा होतो. या शहरात जुन्या काळी उंबराची झाडे खूप होती म्हणून या शहराला उमरावती असे म्हटले जाई.

अमरावती याच नावाचे एक गाव आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात आहे.

इतिहास संपादन करा
अमरावतीचे पुरातन नाव औदुंबरावती होते, ते प्राकृतमध्ये उंबरावती होते. शिवाय हिला प्राचीन काळी इंद्रपुरी म्हणून ओळखले जायचे. उंमरावती याचे स्पेलिंग Umraoti असल्याने त्याच्या उच्चारानुसार गावाचे नाव अमरावती झाले. जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर अमरावती या नावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. या मूर्ती इ.स. १०९७ मधील आहेत.

मध्ययुगीन भारतीय इतिहासातील दख्खनच्या सुलतानशाही (इ.स.१४९०-इ.स.१६९०) पैकी १ वऱ्हाड वा बेरार प्रांताची इमादशाही (इ.स.१४९०-इ.स.१५९०)ची राजधानी असलेली एलिचपूर ही नगरी याच जिल्ह्यामधील एक शहर आहे. त्या शहराला हल्लीअचलपूर म्हणतात.

गोविंद महाप्रभू यांनी १३व्या शतकात अमरावतीला भेट दिली होती.

१४ व्या शतकात दुष्काळ व अवर्षणामुळे अमरावतीमधील लोक माळवा व गुजरातमध्ये स्थलांतरित झाले होते रावबहादूर रघुनाथ नरसिंह मुधोळकर, दादासाहेब खापर्डे, मोरोपंत विश्वासनाथ जोशी, शिवाजीराव पटवर्धन, शिक्षण महर्षि भाऊसाहेब देशमुख असे अनेक भारतीय स्वातंत्र्यसेनानी अमरावतीचे होते.

भूगोल संपादन करा
मुक्ताईगिरी धबधबा चिखलदरा धबधबा

हवामान संपादन करा
अमरावतीचे हवामान हे उन्हाळ्यात गरम व कोरडे आहे. येथील हिवाळा थंड व कोरडा आहे. येथे उन्हाळा मार्च ते जून, पावसाळा जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत , आणि त्यानंतर मार्चपर्यंत हिवाळा असतो.

सर्वाधिक तापमान २५ मे १९५४ रोजी ४६.७° सेल्सियस असे होते आणि सर्वात कमी तापमान ९ फेब्रुवारी इ.स. १८८७ रोजी ५.०° सेल्सियस इतके होते.

शहरातील पेठा संपादन करा
अंबापेठ
राजापेठ
श्रीकृष्णपेठ
अमरावती जिल्ह्याला लागून असणारा परिसर व गावांची नावे : -

१) हरताळा २) अडणगाव ३) अनकवाडी ४) आसरा ५) ऋणमोचन ६) कानफोडी ७) खोलापूर ८) गणोजा ९) गौरखेडा १०) चाकूर ११) जसापूर १२) दाढी पेढी १३) धामोरी १४) निंभा १५) परलाम १६) पांढरी १७) बुधागड १८) भातकुली १९) मलकापूर २०) म्हैसपूर २१) म्हैसांग २२) लोणटेक २३) शिंगणापूर २४) सायत २५) वाठोडा शुकलेश्र्वर

ही सर्व गावे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येतात. भातकुली येथील जैन मंदिरही प्रसिद्ध आहे.

हवामान संपादन करा
शहर समुद्रसपाटीपासून उंचीवर वसलेले असल्यामुळे अमरावतीचे हवामान थंड आहे.[ संदर्भ हवा ] भरपूर प्रमाणात झाडे व शहराच्या परिसरात असणाऱ्या तलावांमुळे पाण्याची मुबलकता आहे. मेळघाट व चिखलदरा परिसर येथून जवळच आहे. शहराजवळ १० किलोमीटरवर पोहरादेवी हे अभयारण्य आहे. शहराला लागूनच डोंगर असल्यामुळे डोंगर कुशीत बसल्यासारखे हे सुंदर शहर मनाला आकर्षित करते.

शिक्षण संपादन करा
अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर संबोधले जाते, इथल्या शैक्षणिक वातावरणामुळे पूर्ण विदर्भ तसेच मराठवाडा व मध्य प्रदेशातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पूर्वेस आहे. पर्वत पायथ्याशी असलेले हे विद्यापीठ अतिशय नयनरम्य वातावरणात आहे. विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध असलेला याचा परिसर खूप मोठा आहे. या विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. येथे संत गाडगेबाबा अध्यासन चालवले जाते.

शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे शिक्षणकेंद्र आहे.

शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बरेच जुने शारीरिक शिक्षण महाविद्यालय असून संपूर्ण भारतातून मुले येथे शिक्षणासाठी येतात. या व्यायामशाळेच्या परिसरात १९८९ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले होते. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृति हजर होते.

शाळा संपादन करा
अमरावती जिल्ह्यात सरकारी शाळांव्यतिरिक्त खालीलप्रमाणे खाजगी शाळा आहेत.

आर डी आइ के कॉलेज, बडनेरा
अस्मिता शिक्षण मंडळाचे अस्मिता विद्या मंदिर
आदर्श प्राथमिक शाळा.
ऑयस्टर इंग्लिश स्कूल, अमरावती.
इंडो पब्लिक स्कूल
DRS मुलांची शाळा
दीप इंग्रजी प्राथमिक शाळा
नवीन उच्च माध्यमिक शाळा
नारायण दास हायस्कूल
पवित्र क्रॉस कॉन्व्हेंट
प्रगती विद्यालय
भंवरीलाल सामरा इंग्रजी हायस्कूल
मणिबाई गुजराती हायस्कूल
महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, (बडनेरा)
गोल्डन किड्स इंग्रजी हायस्कूल (मुलांची शाळा)
मोहनलाल सामरा प्राथमिक शाळा
मित्र उर्दू हायस्कूल
मित्र इंग्रजी हायस्कूल
राजेश्वरी विद्या मंदिर
श्री गणेशदास राठी विद्यालय
श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय
लाठीबाई शाळा
वनिता समाज
विद्वान प्रशाळा
श्री शिवाजी बहुद्देशिय उच्च माध्यमिक शाळा
श्री समर्थ हायस्कूल
सरस्वती विद्यालय
सेंट थॉमस इंग्रजी हायस्कूल
सेंट फ्रान्सिस हायस्कूल
ज्ञानमाता हायस्कूल
न्यू हाई स्कूल मेन शाम चौक
विद्याभारती माध्यमिक विद्यालय,विलास नगर
श्री साईबाबा विद्यालय , साईनगर
विकास विद्यालय, विलास नगर
जैवविविधता संपादन करा
अर्थकारण संपादन करा
राजकमल चौक
पंचवटी चौक
रवीनगर चौक
शेगाव नाका
अंबादेवी रोड
इर्विन चौक
इतवारा बाजार
कॉटन मार्केट
खंडेलवाल मार्केट
गांधी चौक
जवाहर रोड
जयस्तंभ चौक
जोशी मार्केट
तख्तमल इस्टेट
नवाथे चौक
श्याम चौक
सराफा बाजार
प्रशासन संपादन करा
नागरी प्रशासन संपादन करा
जिल्हा प्रशासन संपादन करा
वाहतूक व्यवस्था संपादन करा
रेल्वे वाहतूक संपादन करा
अमरावती शहरात अमरावती, बडनेरा आणि नवीन अमरावती ही तीन मुख्य रेल्वे स्थानके आहेत. अमरावती स्थानक हे जुन्या शहरात आहे. बडनेरा हे स्थानक मुंबई - कलकत्ता लोहमार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. तसेच नवीन अमरावती स्थानक हे अमरावती - नरखेड लोहमार्गावर वसले आहे.

अमरावती येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या संपादन करा
क्रमांक अागगाडीचे नाव गंतव्यस्थान कधी सुटण्याची वेळ
५११३६ पॅसेंजर बडनेरा रोज ०२:१५
५११३८ पॅसेंजर बडनेरा रोज ०३:५५
१२११९ इंटरसिटी एक्सप्रेस अजनी सोम, मंगळ, बुध, गुरू, शुक्र ०५:३०
१२७६६ सुपरफास्ट एक्सप्रेस तिरुपति सोम, गुरू ०६:५५
५११४० पॅसेंजर बडनेरा रोज ०७:१५
५९०२६ फास्ट पॅसेंजर सुरत सोम, शुक्र, शनि ०९:००
५११४२ पॅसेंजर बडनेरा रोज ११:४५
५१२६१ पॅसेंजर वर्धा रोज १५:१०
१२१५९ सुपरफास्ट एक्सप्रेस जबलपूर रोज १७:४५
११४०६ एक्सप्रेस पुणे सोम, शनि १८:३०
५११४६ पॅसेंजर बडनेरा रोज १८:५०
१२११२ अंबा सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबई रोज १९:०५
५११४८ पॅसेंजर बडनेरा रोज २०:२५
५११५० पॅसेंजर बडनेरा रोज २३:४०
लोकजीवन संपादन करा
जुनी अमरावती संपादन करा
एकेकाळी अमरावती जवाहर गेट, खोलपुरी गेट, नागपुरी गेट आणि अंबा गेट यांच्या आतच सामावलेली होती. काळानुसार अमरावतीचा विस्तार झाला व तटबंदीच्या आतील अमरावतीला 'जुनी अमरावती' असे म्हणले जाऊ लागले. सराफा बाजार (दागिन्यांचा) जवाहर गेटच्या आतमध्ये वसलेला आहे.

उत्सव संपादन करा
तटबंदीच्या आतमध्ये भाजी बाजार आणि बुधवारा असे दोन प्रभाग आहेत. हे दोन्ही प्रभाग गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. भाजी बाजारमधील छत्रपती शिवाजी मंडळ व सार्वजनिक मंडळ ही नावाजलेली गणेशोत्सव मंडळे आहेत. बुधवाऱ्यामधील लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळ, आझाद हिंद मंडळ, नीलकंठ मंडळ, आणि अनंत मंडळ ही प्रसिद्ध आहेत. या मंडळांतर्फे गणेशोत्सवाच्या काळात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

मंदिरे संपादन करा
जुन्या अमरावतीमध्ये भाजी बाजारात बाळकृष्ण मंदिर, मुरलीधर सोमेश्वर मंदिर, नारायण गुरू मठ, लक्ष्मी नारायण मंदिर, जैन श्वेतांबर मंदिर, काळा मारोती मंदिर , काळा राम मंदीर , सत्यनारायण मंदीर , राधाकृष्ण मंदीर , दत्त मंदीर , मृगेंद्र मठ , इत्यादी . मंदिरे आहेत. नीलकंठ मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, मुंजाबाबा मंदिर,एकवीरा देवी मंदिर ही बुधवाऱ्यामध्ये आहेत. अंबा देवी मंदिर हे अंबा गेटवर आहे.श्री बडे‌ बालाजी‌‌ मंदिर‌ हे गांधी‌ चौक मध्ये आहे‌. तिथेच मृगेंद्रस्वामी मठही आहे. जामा मशीद साबनपुरा येथे आहे.

विस्तार संपादन करा
अमरावती शहराची रचना फार छान आहे. रुंद रस्ते आणि शहराचा विस्तीर्ण विस्तार शहराला भव्यता देतात. मुख्य चौक म्हणजे राजकमल चौक, इर्विन चौक, श्याम चौक, राजापेठ चौक, पंचवटी चौक, अंबापेठ चौक, आणि ज्या अंतिम बस स्थानकाला येथे डेपो असे म्हणतात तो डेपो चौक.

हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे - अंबा गेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. जुने गाव हे तटबंदीच्या आत वसलेले असायचे. आज शहराचा विस्तार फार झाला आहे. आता महापालिकेच्या सरहद्दी बाजूच्या उपनगरांच्याही बाहेर गेल्या आहेत. वलगाव, बडनेरा आता अमरावती शहरात मोडतात. शहराचे मुख्य भाग म्हणजे गांधी चौक,अंबा पेठ, गाडगे नगर, साईनगर, श्रीकृष्ण पेठ, दस्तुर नगर, राजापेठ, सातुर्णा, कंवर नगर, रुक्मिणी नगर, यशोदा नगर, इत्यादी.

अमरावती शहराच्या १० किमी दक्षिणेला मुंबई-भुसावळ-वर्धा-नागपूर रेल्वे मार्गावर बडनेरा हे एक रेल्वे स्थानक आहे. शहराची वाढ झपाट्याने बडनेऱ्याच्या दिशेने होत आहे.

अमरावती हे औद्योगिक वाढीचे शहर आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये कुऱ्हा गावी असलेला विदर्भ शुगर मिल लिमिटेड हा चालू असलेला एकमेव साखर कारखाना आहे

सांस्कृतिक संपादन करा
अंबादेवी हे शहराचे मुख्य दैवत आहे. शहराच्या मध्यावर अंबापेठेत देवीचे पुरातन देऊळ आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला याच मंदिरात बोलावले होते, असे म्हटले जाते. येथे श्रीकृष्णाने देवीची पूजा करून रुक्मिणीला सोबत नेले होते. मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या खाली योगाचार्य जनार्दन स्वामी यांची समाधी आहे.

श्री शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेला तपोवन हा कुष्ठरोग्यांसाठीचा प्रकल्प शहराच्या पूर्वेला विद्यापीठाच्या इमारतीसमोर आहे.

शिक्षण संपादन करा
प्राथमिक व विशेष शिक्षण संपादन करा
महत्त्वाची महाविद्यालये संपादन करा
केशरबाई लाहोटी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय
कृषि महाविद्यालय
श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय.
तक्षशिला कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय
प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च, बडनेरा
बियाणी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
विदर्भ ज्ञान विज्ञान संथेचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
विद्याभारती कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
शासकीय तंत्रनिकेतन
श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय
विमलाबाई देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
भारतीय महाविद्यालय
संशोधन संस्था संपादन करा
खेळ संपादन करा
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय
पर्यटन स्थळे संपादन करा
चिखलदरा
मेळघाट
सेमाडोह
अंबादेवी मंदिर
श्री क्षेत्र बहिरम
बांबू उद्यान
छत्री तलाव
वडाळी तलाव
पिंगळादेवी गड
एकवीरादेवी मंदिर
अष्टमासिद्धी
अप्पर वर्धा धरण (नल-दमयंती सागर)
श्री क्षेत्र कोंडेश्वर
माताखिडकी श्रीकृष्ण मंदिर
वाठोडा शुक्लेश्वर
भडका धबधबा [घोडदेव, मोर्शी]

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...