Tuesday, 5 April 2022

जगातील सर्वात मोठे आणि मातीचे प्रकार व स्थान

* खंड - आशिया

* विस्तारित देश - रशिया

* लोकसंख्येचा देश - चीन

* द्विपसमूह - इंडोनेशिया

* त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]

* वाळवंट - सहारा

* महासागर - पॅसिफिक

* द्विपकल्प - अरेबिया

* बेट - ग्रीनलँड

* खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया

* समुद्र - दक्षिण चिनी समुद्र

* उपसागर - हडसनचा उपसागर

* आखात - मेक्सिकोचे आखात

* नदी व खोरे - अमेझॉनचे खोरे

* पर्वतराजी - हिमालय

* मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया

* गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर

* ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.

* समुद्रभरती - फुंडीचे आखात

* खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र

* नदी मुख - ऑब नदीचे मुख

* वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड

* लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील

* अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया

* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका

* बंदर - न्यूयॉर्क

* विस्तारित शहर - लंडन

♻️ महत्त्वाचे आहे नक्की वाचा

🔸१) पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर ....
- १४,९६,००,००० कि. मी.

🔹२) प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग ....
- २,९९,७९२ कि. मी.

🔸३) सूर्यकुलातील सर्वांत लहान, परंतु वेगवान ग्रह
- बुध

🔹४) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठा असलेला .... हा ग्रह सूर्यकुलातील सर्वांत मोठा ग्रह आहे.
- गुरु

🔸५) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठ्या असलेल्यागुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या .... इतके आहे.
- ३१८ पट

● मातीचे प्रकार व स्थान ●

◆गाळाची मृदा
सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.

◆काळी मृदा
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

◆तांबडी मृदा
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

◆वाळवंटी मृदा
राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

◆गाळाची मृदा
नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.


📚 *स्पर्धा परीक्षा : भूगोल*

स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने भूगोल विषयातील काही महत्वाच्या सागरी संज्ञांविषयी आज आपण माहिती घेऊयात.

▪️सागर :जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर किंवा समुद्र होय.

▪️महासागर : दोन खंडांदरम्यान पसरलेला खा-या पाण्याचा विस्तीर्ण साठा म्हणजे महासागर होय.

▪️उपसागर :सर्वसाधारणपणे जमिनीने तीन बाजूंनी  वेढला गेलेला सागराचा लहान भाग म्हणजे उपसागर होय.

▪️आखात :जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग, म्हणजे आखात होय.

▪️सरोवर : भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरीत्या तयार झालेला जलाशय म्हणजे सरोवर होय.

▪️जलावरण : पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग, म्हणजे जलावरण होय.

▪️खाडी : समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून जेथेपर्यंत  नदीत शिरते, त्या नदीच्या भागाला खाडी म्हणतात.

▪️सागरी मैदान :सागरतळाचा सपाट व सखल भाग म्हणजे सागरी मैदान होय.

▪️गर्ता :सागरातील अरुंद व अतिखोल भागास गर्ता म्हणतात.

▪️ सागरी डोह :सागरतळावर काही ठिकाणी खोल,अरुंद आणि तीव्र उतारांची सागरी भूरूपे आढळतात. त्यातील कमी खोलीच्या अरुंद व तीव्र उतारांची सागरी भूरूपे म्हणजे सागरी डोह होय.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...