Wednesday, 13 April 2022

सामाजिक भूगोल

सामाजिक भूगोल...


सामाजिक भूगोल....
सामाजिक भूगोलमानवी भूगोलाची एक मुख्य शाखा. मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास या शाखेत केला जातो. सामाजिक भूगोलाची सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली नाही.त्याचप्रमाणे सामाजिक व सांस्कृतिक भूगोलशास्त्रांचे स्वरूप आणि व्याप्ती यांच्यातील निश्चित सीमारेषेबाबतही संदिग्धता आहे. वेगवेगळ्या भूगोलतज्ज्ञांनी केलेल्या सामाजिक भूगोलाच्या व्याख्यांमध्ये तफावत दिसून येते. ई. डब्ल्यू. गिल्बर्ट व आर्. डब्ल्यू. स्टील या तज्ज्ञांच्या मते विविध पर्यावरणातील सामाजिक समुदायांचे वितरण व त्यांची जीवनशैली तसेच अधिवास, आरोग्य आणि वेगवेगळ्या लोकसमूहांतील मजुरांची स्थिती यांचे भौगोलिक विश्लेषण म्हणजे सामाजिक भूगोल होय. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणानुसार सामाजिक भूगोलात लोकसंख्या, लोकसंख्येचे वितरण व संरचना, स्थलांतर, मानवी वसाहती, मानवाचे सांस्कृतिक वर्तन,वेगवेगळ्या समाजघटकांमधील परस्परसंबंध, सामाजिक गुन्हेगारी इ. मानवी समाजघटकांचा अभ्यास केला जातो.
सामाजिक भूगोल ही नव्याने उदयास आलेली शाखा आहे. समाजाचा आकार जसजसा विस्तृत होऊ लागला, समाजरचना गुंतागुंतीची बनू लागली व सामाजिक समस्यांची संख्या व तीव्र ता वाढत गेली, तसतसे विचारवंतांनी आपले लक्ष समाजाच्या अभ्यासाकडे वळविले. या अभ्यासामधूनच सामाजिक भूगोल हा स्वतंत्र विषय विकासित होत गेला. अभिजात युगातील समन्वेषक व इतर व्यक्तींचे लिखित दाखले तसेच विसाव्या शतकातील भूगोलतज्ञांचे संशोधनकार्य यांमधून सामाजिक भूगोलाचा उद्‌गम स्पष्ट होतो.

ग्रे को–रोमन काळातील समन्वेषक आणि लेखक यांनी लिहिलेले वर्णनात्मक अहवाल ऐतिहासिक पूर्वो दाहरण म्हणून देता येतील. हीरॉडोटस, थ्यूसिडिडीझ, स्ट्रेबो व अन्य लेखक या संदर्भात जागतिक-सामाजिक विभेदाविषयी पहिले लिखित प्रतिबोधन (मान्यता) देतात. अशा प्रकारची विश्वकोशीय वर्णने पाश्चात्त्य देशांत सतराव्या शतकात अधूनमधून आढळतात.उदा., मार्को पोलो व मिशनऱ्यांचे वृत्तांत. जगाच्या वेगवेगळ्या भागांत तेथील नैसर्गिक पर्यावरणाच्या, विशेषतः हवामानातील भिन्नतेनुसार विविध प्रकारचे सामाजिक जीवन आढळते. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ फेडेरिक ली प्ले (१८०६–८२) याने फ्रान्समधील कामगारांच्या कुटुंबातील सामाजिक परिस्थितीचा जो प्रत्यक्ष अभ्यास केला होता, तो सामाजिक भूगोलाचाच अभ्यासविषय होता. जर्मन भूगोलज्ञ ⇨राट्सेल फीड्रिख (१८४४–१९०४) याच्या अँथ्रॉपोजिऑगफी (१८८२;१८९१) या द्विखंडीय ग्रंथातील तसेच इतर लेखांमधील वर्णन हे सामाजिक भूगोलाशी निगडित होते. त्याने प्राकृतिक पर्यावरणाचा व्यक्तीवर व समाजावर होणारा परिणाम स्पष्ट केला. जर्मन भूगोलज्ञ कार्ल रिटर, अलेक्झांडर फॉन हंबोल्ट,हॅसिंगर, रू हल व हेटनर, फ्रेंच भूगोलज्ञ एलीझे रक्ल्यू, अमेरिकन भूगोलज्ञ जॉर्ज पेर्किन्स मार्श व ब्रि टिश भूगोलज्ञ एच्. जे.मॅकिंडर हे सामाजिक भूगोलशास्त्राचे प्रवर्तक मानले जातात; तथापि ली प्ले याची सामाजिक सर्वेक्षण चळवळ, राट्सेलचा मानवजाती भूगोल आणि फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ⇨एमील द्यूरकेम (१८५८–१९१७) याचे समाजरचनेचे शास्त्र (सोशल मॉर्फालॉजी)यांमधून त्यांनी सामाजिक भूगोल या विषयाच्या संदर्भातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या. या तीन महत्त्वाच्या विचारधारा ह्या आधुनिक सामाजिक भूगोलशास्त्राच्या विकासाचे आद्य टप्पे मानले जातात. ली प्ले याच्या अनुयायांच्या लेखनातही या विषयाला धरून विवेचन आढळते. कार्ल रिटर याने भौगोलिक प्रदेशाची ‘जैविक एकात्मता’ ही संकल्पना प्रतिपादन केली.यामध्ये नैसर्गिक परिस्थिती आणि तेथील लोकसंख्या व संस्कृती यांच्यात एकात्मता आढळते, असे स्पष्ट केले.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भूगोलतज्ञांनी समाज आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांच्या अभ्यासावर विशेष भर दिला.अँग्लो–अमेरिकन परंपरेतील व्यक्ती जॉर्ज विल्सन होक याचा ‘द स्टडी ऑफ सोशल जिऑगफी’ हा शोधनिबंध १९०७ मध्ये प्रसिद्घ झाला. त्यात त्याने ‘सामाजिक भूगोल’ ही संज्ञा वापरली होती. वाढती लोकसंख्या, मानवी वसाहती, नागरीकरण व त्यांमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या इ. अभ्यासविषय सामाजिक भूगोलात समाविष्ट होऊ लागले. कोणत्याही प्रदेशातील मानवी जीवनावर तेथील भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव पडत असतो. काही भूगोलज्ञांनी तर नैसर्गिक पर्यावरणातील घटकांचा आधार घेऊन असे स्पष्ट केले, की समाजातील मद्यप्राशन, घटस्फोट, बहुविवाहपद्घती, रू ढी, परंपरा यांच्या पाठीमागे निसर्ग असतो. व्हीदाल द ला ब्लांश या प्रसिद्घ फ्रेंच भूगोलज्ञाने राट्सेलच्या अतिशयोक्तीपूर्ण पर्यावरणीय निसर्गवाद (नियतिवाद, अशक्यतावाद) या विचारप्रणालीऐवजी संभववाद (शक्यतावाद) ही अधिक लवचिक संकल्पना मांडली. त्याच्या मते मानवाला नैसर्गिक पर्यावरणामध्ये इष्ट ते बदल घडवून आणता येतात. त्याने भूगोलाच्या अभ्यासात मानवाला केंद्रस्थानी मानले. आधुनिक मानवी व सामाजिक भूगोलाच्या विकासावर व्हीदालच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो. सुरुवातीच्या काळातील–विशेषतः फ्रेंच–भूगोलज्ञांनी सामाजिक भूगोलाचा अभ्यास प्रादेशिक विवरणशास्त्र या दृष्टिकोनातून केला. इलीस याच्या मते सामाजिक भूगोल हे व्हीदाल द ला ब्लाश व बोबेक यांचेच पुढे चालत आलेले तत्त्वज्ञान होय.

दुसऱ्या महायुद्घापूर्वीच्या काळात सामाजिक भूगोलाच्या घटकांचे पद्घतशीर वर्गीकरण करण्याकडे तसेच या विषयाचा सैद्घांतिक आकृतिबंध मांडण्यावर भूगोलज्ञांनी विशेष भर दिला नव्हता. पिअरी जॉर्ज व मॅक्सीमीलीएन सोर यांनी पहिल्यांदा असे वर्गीकरण केले (१९४३–५३). १९६० च्या दशकातील सामाजिक भूगोलाच्या विकासाचे प्रमुख तीन प्रवाह आढळतात.त्यांपैकी पहिला प्रवाह, कल्याणकारी किंवा मानवतावादी विचारप्रणालीचा. तिचा भर कल्याणकारी अर्थव्यवस्थेच्या आकृतिबंधांतर्गत निवासव्यवस्था, आरोग्य व सामाजिक चिकित्सेवर होता. दुसरा प्रवाह, मूलगामी विचारप्रणालीचा. ती मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित असून तिचा भर दारिद्रय व सामाजिक विषमता या समस्यांच्या मूळ कारणांच्या विश्लेषणावरहोता, तर तिऱ्या प्रवाहाचा भर वांशिक किंवा धार्मिक भिन्नतेच्या अभ्यासावर होता. पाश्चिमात्य भूगोलज्ञांनी प्रामुख्याने सामाजिककल्याणावर विशेष भर दिलेला आढळतो. कल्याणकारी राज्य म्हणजे सर्व नागरिकांच्या मूलभूत कल्याणाची जबाबदारीस्वीकारून त्यानुसार शासकीय धोरणे व कार्य करणारी राज्यसंस्था होय.

पहिल्या पिढीतील भारतीय भूगोलज्ञ जॉर्ज कुरियन, एस्. पी. चतर्जी, एस्. एम्. अली, सी. डी. देशपांडे तसेच व्ही. एस्.गणनाथन, व्ही. एल्. एस्. प्रकाश राव यांनी राज्यपुनर्रचना, देशाचा नियोजनबद्घ विकास आणि नैसर्गिक संसाधनांचा अधिककार्यक्षमतेने वापर करणे इ. बाबतींत नियोजन आयोगासारख्या संस्थांचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका पारपाडली. त्यांचे मार्गदर्शन भूगोल–विषयांतर्गत होते; परंतु राष्ट्रहिताच्या दृष्टीने समकालीन प्रश्नांना अनुसरून भारतातसामाजिक भूगोल या विषयाबाबत विशेष संशोधन झाले नाही. अलीकडच्या काळात मात्र सामाजिक भूगोलशास्त्रविषयकअभ्यास होऊ लागला आहे.

सामाजिक भूगोल अभ्यासाच्या केंद्रस्थानी मानव आणि समाज असला, तरी त्याच्या स्वरूप व व्याप्तीचे अंतिम प्रारूप कोणते, याविषयी सामाजिक भूगोलज्ञांनी वेगवेगळे विचार मांडले आहेत. त्यामध्ये गिल्बर्ट, टेलर, जे. एम्. हाऊस्टन, डब्ल्यू. फिट्स्जेराल्ड व एल्सवर्थ हटिंग्टन इत्यादींनी सामाजिक भूगोलाची व्याप्ती अधिक स्पष्ट केली आहे. गिल्बर्ट व हटिंग्टन यांच्या मते सामाजिक भूगोल हा विषय अत्यंत व्यापक असून त्यामध्ये भौतिक आणि सामाजिक शास्त्रांच्या उपयुक्ततेचा मिलाफ झालेला आहे. या भूगोल शाखेत प्रामुख्याने मानवी समाज व पर्यावरण यांच्या परस्परसंबंधांच्या अभ्यासाचा अंतर्भाव होतो. मानवी समाजाचे अभिक्षेत्रीय वितरण, लोकसंख्येची वाढ, घनता,संरचना, मानवी वंश, मानवी वसाहतींचा उगम, विकास, प्रारूप व त्यांचे वितरण, स्थलांतर, मानव समूहातील शारीरिक व सांस्कृतिक भिन्नता, आर्थिक व्यवसायांतील विविधता इ. विषयांच्या अभ्यासाचा समावेश या शाखेत केला जातो. त्याशिवाय स्त्रिया, वृद्घ, गरीब, अल्पसंख्याक, मनोरुग्ण, गुन्हेगार, सामाजिक विषमता, सामाजिक विकृती, निवासाचे प्रश्न इ. समस्यांची कारणे, उपाययोजना आणि सामाजिक कल्याण यांचा विचार सामाजिक भूगोलज्ञ करीत असतात. त्याचप्रमाणे विविधप्रदेशांतील नैसर्गिक पर्यावरणाचा या सर्व घटकांवर व त्यांच्या अभिक्षेत्रीय वितरणांवर कसा परिणाम होतो, त्याचाही अभ्यास याशाखेत केला जातो. नैसर्गिक व सांस्कृतिक परिस्थितीचा एकत्रित अभ्यास ज्या ज्या विषयांत केला जातो, त्या सर्व विषयांशीसामाजिक भूगोलाचा संबंध येतो. उदा., इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र,पुरातत्त्वविद्या, समाज–भाषाशास्त्र इत्यादी. सामाजिक भूगोलाच्या लोकसंख्या,–भूगोल, वसाहत भूगोल–राजकीय, लष्करीव ऐतिहासिक भूगोल, पर्यटन, वैद्यक, वर्तणूक व गुन्हेविषयक भूगोल इ. उपशाखा मानल्या जातात. विकासित देशांतसामाजिक भूगोलज्ञांचा विशेष कल नागरी प्रश्नांवर असलेला आढळतो.

आधुनिक समाजात आढळणाऱ्या गुन्हेगारी, बेकारी, घटस्फोट इ. समस्यांचे स्वरूप व कारणे शास्त्रशुद्घ पद्घतीने निश्चित करून,त्यांवर परिणामकारक उपाययोजना करणे, हे या शाखेच्या अलीकडील अभ्यासात गृहीत धरले आहे. समाजात निरनिराळ्याजातिधर्मांचे, वंशांचे व संस्कृतींचे लोक एकत्र राहतात. त्यांच्या मनात परस्परांबद्दल कारणपरत्वे काही पूर्वग्र ह तयार झालेलेअसतात. या पूर्वग्र हांचे परिणाम त्यांच्या परस्पर संबंधांवर झालेले आढळतात. सामाजिक भूगोलाच्या संशोधनाने ते पूर्वगहकसे निराधार आहेत, हे स्पष्ट करता येते. या विषयाच्या अभ्यासाने वेगवेगळ्या जाती, धर्म, वंश व संस्कृतींच्या लोकांमध्येसामंजस्याची भावना निर्माण करणे शक्य होते. आधुनिक समाजरचना अतिशय गुंतागुंतीची बनली आहे. या समाजरचनेचे पुरेसेज्ञान व्यक्तीला झाले तरच ती व्यक्ती या समाजरचनेबरोबर परिणामकारकपणे जुळवून घेऊ शकते. सामाजिक नियोजनकरणारे सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यक्रर्ते, तंत्रज्ञ इत्यादींना सामाजिक भूगोलशास्त्रीय सिद्घांतांचे ज्ञान असणे आवश्यकअसते. त्या ज्ञानाच्या आधारानेच त्यांना सामाजिक नियोजनाची उद्दिष्टे साध्य करण्याचे मार्ग आणि पद्घती निश्चित करतायेतील.

अलीकडच्या काळात सामाजिक भूगोलज्ञ मानव व समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी वेगवेगळ्या अध्यापनपद्घतींचा अवलंबकरीत आहेत. उदा., प्रादेशिक, कार्यात्मक, तात्त्विक व एकात्मक दृष्टिकोन, सांख्यिकी, वैयक्तिक व तुलनात्मकअध्यापनपद्घती इत्यादी. शिवाय मानवाच्या आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी दारिद्र्य, उपासमार, गुन्हे, वर्णभेद, सामाजिकविषमता, नैसर्गिक आपत्ती इ. बाबींची जाणीवपूर्वक दखल घेऊन अभ्यास केला जात आहे. अशाप्रकारे एकविसाव्या शतकातयेऊ घातलेली विविध आव्हाने स्वीकारण्याच्या दिशेने सामाजिक भूगोलाच्या प्रगतीची वाटचाल चालू आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...