In use🎯 History By Sachin Gulig:
◆◆ धरणांची पाणी क्षमता ◆◆
● धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???
1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??
2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??
3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??
● सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.
● इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???
● आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.
● पाणी मोजण्याची एकके
● स्थिर पाणी मोजण्याची एकके –
1) लिटर
2) घनफूट
3) घनमीटर
4) धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)
● एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.
1 टीएमसी = 28,316,846,592 लिटर्स
2) वाहते पाणी मोजण्याची एकके-
1) 1 क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते.
2) 1 क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते.
● उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.
म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.
● याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.
● म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
◆ महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 06 धरणे
1)उजनी 117.27 टीएमसी
2)कोयना 105.27 टीएमसी
3)जायकवाडी 76.65 टीएमसी ( पैठण )
4)पेंच तोतलाडोह 35.90 टीएमसी
5) वारणा 34.40 टीएमसी
6) पूर्णा येलदरी 28.56 टीएमसी
___________________________
💥💥💥💥💥💥💥💥💥
📌 1 नोव्हेंबर 1993 रोजी स्थापित युरोपीय संघ (EU) हा मुख्यतः युरोपमध्ये स्थित इतक्या देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह आहे
👉 - 28.
📌 आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) कडून या साली प्रथम विश्वचषक आयोजित करण्यात आला.
👉 - सन 1930.
📌 आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA)चे स्थापना वर्ष
👉 – सन 1904.
No comments:
Post a Comment