Tuesday, 8 November 2022

अर्थशास्त्र चे काही प्रश्न

१) नाबार्ड बाबत कोणते विधान अयोग्य आहे?

नाबार्ड ची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार झाली.
नाबार्ड ची स्थापना 1982 मध्ये झाली.
नाबार्ड केवळ पुनर्वित्त पुरवठा करते.
नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.
उत्तर – नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.

२. नाबार्ड खालीलपैकी कोणाला पुनर्वित्त पुरवठा करते?

भूविकास बँका
प्रादेशिक ग्रामीण बँका
राज्य सरकार
वरील सर्व
उत्तर – वरील सर्व

३. आफ्रिकन देशांपैकी भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार कोणत्या देशाशी आहे?

नायजेरिया
झिंबाब्वे
दक्षिण आफ्रिका
सुदान
उत्तर – दक्षिण आफ्रिका

४. लोक अंदाज समिती मध्ये किती सदस्य असतात?

7
15
22
30
उत्तर – 30

5. सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला ……… असे म्हणतात.

मौद्रिक धोरण
द्रव्य निर्मिती
राजकोषीय धोरण
चलन विषयक धोरण
उत्तर – राजकोषीय धोरण

6. खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही?

निर गुंतवणुकीतून प्राप्त झालेला नफा
निव्वळ देशी कर्जे
व्याज खर्च
लोक लेख्यातील जमा
उत्तर – व्याज खर्च

Economics Practice Question

७. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही?

आयकर
सेवा कर
महामंडळ कर
जमीन महसूल
उत्तर – सेवाकर

८.सरकारने आकारलेल्या करा बद्दल कोणते विधान अयोग्य आहे?

कर हे सक्तीचे देणे असते.
कर्ण भरणे हा कायद्याने गुन्हा असतो.
कर उत्पन्नाचा वापर सरकार सार्वजनिक खर्चासाठी करते.
करदात्यांना सरकार मार्फत प्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.
उत्तर – करदात्यांना सरकार मार्फत अप्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.

९. प्रत्यक्ष कर कशावर लादला जात नाही?

A. उत्पन्नावर
B. उत्पादनावर
C. संपत्तीवर
D. भांडवली नफ्यावर
उत्तर – उत्पादनावर

१०. खालीलपैकी कोणता स्त्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही.

देशातील बँका व इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज
विमा निधी
भविष्य निर्वाह निधी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज
उत्तर – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...