Sunday, 10 April 2022

लक्षात ठेवा


"Current Affairs -

1)केवडिया सफारी पार्क _ या राज्यात आहे.
(A) मध्यप्रदेश
(B) गुजरात.  √
(C) राजस्थान
(D) हिमाचल प्रदेश

2)भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. आयोग केवळ लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेते.

2. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच मुख्य निवडणूक आयुक्त या पदावर असलेल्या व्यक्तीला पदावरून हटवता येते.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2).  √

3)_____ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा केला जातो.
(A) 18 फेब्रुवारी
(B) 19 फेब्रुवारी
(C) 20 फेब्रुवारी
(D) 21 फेब्रुवारी.  √

4)कोणत्या संस्थेला दिवंगत मनोहर पर्रीकर ह्यांचे नाव देण्यात आले आहे?
(A) संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था.  √
(B) संरक्षण संशोधन व विकास संस्था
(C) संरक्षण गुप्तचर संस्था
(D) दिलेल्यापैकी एकही नाही

5)2020 टोकियो ऑलम्पिकचे अधिकृत बोधवाक्य काय आहे?
(A) युनायटेड बाय इमोशन.  √
(B) युनायटेड बाय स्पोर्ट्स
(C) युनायटेड ऑफ स्पिरिट
(D) युनायटेड ऑफ पर्पज

6)भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. SEBI ही एक घटनात्मक संस्था आहे.

2. ही भारतातल्या रोखे, समभाग व्यापार बाजारपेठांवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे.

दिलेल्यापैकी अचूक उत्तर ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2).  √
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

7)_______ राज्य सरकारने नवी ‘समरक्षने’ योजना लागू केली.
(A) केरळ
(B) कर्नाटक.  √
(C) तामिळनाडू
(D) तेलंगणा

8)भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष आणि भारत सरकारचे वित्त वर्ष एकच करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
(A) बिमल जालान समिती.  √
(B) केळकर समिती
(C) श्रीधर समिती
(D) रघुराम राजन समिती

9)‘ब्ल्यु ऑरिजिन प्रोग्राम’ __ याच्या संदर्भात आहे.
(A) मासे आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणे
(B) अंटार्क्टिक प्रदेशामध्ये शोधकार्यासाठी NASAचे अभियान
(C) समुद्रकिनारपट्टी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जागतिक महासागर आयोग
(D) अंतराळाचा प्रवास.  √

10)भारतीय सीमा निर्धारण आयोग याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. 42व्या सुधारणा कायद्याने 2000 सालापर्यंत मतदारसंघांची सीमा निर्धारण प्रक्रिया थांबवली होती.

2. भारतात सीमा निर्धारण आयोग चार वेळा गठित केले गेले आहेत.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही.  √
(D) ना (1), ना (2)

No comments:

Post a Comment