Monday, 25 April 2022

जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेखा

🌎 *जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेखा*

MPSC आणि UPSC सोबत विविध स्पर्धा परीक्षांना जगाचा भूगोल मध्ये जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेखावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या परीक्षा देताना या सर्व सीमारेखा तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

*डुरंड लाइन (Durand Line)*
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशा दरम्यातील सीमा
सर मार्टीमर डुरंड यांनी 1886 मध्ये निर्धारित केली.

*मॅकमॅहॉन लाइन(Macmahon Line)*
भारत आणि चीन देशा दरम्यातील सीमा 1120 किमी. ची हि सीमा
सर हेनरी मॅकमॅहन यांच्या द्वारे निर्धारित केली गेली.

*रॅडक्लिफ लाइन(Radcliffe Line)*
भारत आणि पाकिस्तान देशादरम्यातील सीमा
1947 मध्ये भारत-पाकिस्तान सीमा आयोगाचे अध्यक्ष सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या द्वारे निर्धारित केली गेली.

*17 वि समांतर सीमारेखा (17th Parallel)*
उत्तर व्हिएतनाम आणि डी. व्हिएतनाम देशादरम्यातील सीमा
व्हिएतनामचे एकत्रीकरण होण्यापूर्वी हि सीमारेषा या दोघांना वेगळे करत होती.

*24 वी समांतर सीमारेखा (24th Parallel)*
भारत आणि पाकिस्तान देशादरम्यातील सीमा
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार कच्छ प्रदेशाची ही सीमारेखा योग्यरित्या ठरवली गेली आहे पण भारत देश अजून हे मान्य करत नाही आहे.

*38 वी समांतर सीमारेखा (38th Parallel)*
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया देशादरम्यातील सीमा
हि सीमारेखा कोरिया देशाला दोन भागात विभागते.

*49 वी समांतर सीमारेखा (49th Parallel)*
अमेरिका आणि कॅनडा देशादरम्यातील सीमा
अमेरिका आणि कॅनडा या देशांना दोन भागात विभागते.

*हिंदेनबर्ग लाइन (Hindenburg Line)*
जर्मनी आणि पोलंड देशादरम्यातील सीमा
प्रथम विश्वयुद्धानंतर जर्मन सैन्य येथून परतले होते.

*ऑर्डर-नीझी लाइन (Order-Neisse Line)*
जर्मनी आणि पोलंड देशादरम्यातील सीमा दुसऱ्या महायुद्धांनंतर निश्चित केली गेली.

*मॅजिनोट लाइन (Maginot Line)*
जर्मनी आणि फ्रान्स देशादरम्यातील सीमा फ्रान्सने जर्मनिच्या आक्रमणापासून बचावासाठी हि सीमारेखा बनवली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment