🔥भारतात आर्थिक गुन्हे केल्यानंतर येथील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ब्रिटनमध्ये आश्रय घेऊ पाहणाऱ्यांचे ब्रिटनमध्ये स्वागत केले जाणार नाही, अशी ग्वाही ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी येथे बोलताना दिली.
🔥 भारतातील मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रश्नावर विचारले असता ते म्हणाले की, आम्ही हा मुद्दा खासगी आणि मैत्रिपूर्णरित्या मांडत असतो. पण भारत हा मोठा लोकशाही देश असून तेथील समाजघटकांना घटनात्मक संरक्षण आहे, असेही त्यांनी आवर्जुन नमुद केले.
🔥भारतातून फरार झालेले नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, काही कायदेशीर मुद्दय़ांमुळे हे कठीण बनले असले तरी ब्रिटिश सरकारने त्यांच्या प्रत्यार्पणसाठी आदेश दिले आहेत.
🔥 त्यांच्यावर भारतात कायदेशीर कारवाई होण्यासाठी त्यांना परत पाठविले पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे.
🔥भारतातील प्रज्ञावंत, हुशार व्यक्तींचे आम्ही ब्रिटनमध्ये स्वागतच करतो, पण आम्ही हे स्पष्टपणे सांगत आहोत की, भारतातील कायद्याला चकवा देऊ पाहणाऱ्यांचे ब्रिटनमध्ये स्वागत केले जाणार नाही.
🔥भारताचे परराष्ट्रसचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले की, आर्थिक गुन्हेगारांना भारतात परत आणण्यासाठी आम्ही ब्रिटिश सरकारकडे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
🔥यासंदर्भात ब्रिटिश सरकार संवेदनशीतेने काम करीत असल्याचे पंतप्रधान जॉन्सन यांनी आम्हास सांगितले आहे.
🔥बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला ‘खास दोस्त’ असे संबोधित करून यंदाच्या दिवाळीपर्यंत ब्रिटन आणि भारतात मुक्त व्यापार करार होईल, असा विश्वास व्यक्त केला.
🔥पुढील सप्ताहात उभय देशांत या संदर्भातील चर्चेची पुढील फेरी होणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत याला अंतिम स्वरूप देण्याची सूचना वाटाघाटी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही दिल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment