महाराष्ट्रातील मुख्य खनीज संपत्ती
महाराष्ट्र राज्यामध्ये खालील महत्वाची खनिजे आढळून येतात.
(1) कोळसा :- खनिज कोळसा हे एक ऊर्जा शक्तीचे महत्वाचे साधन आहे आणि म्हणूनच राष्ट्राच्या विकासात हया खनिजाचा वाटा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील कोळशाचे अंदाजित साठे 5539.07 दशलक्ष टन इतके आहेत. राज्यात कोळशाचे साठे नागपूर, चंद्रपूर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात आढळून आले आहेत. राज्यतील उत्पादनापौकी अधिकांश कोळसा विज निर्मिर्ती, सिमेंट उत्पादन, स्पॉन्ज आयर्न व इतर अनेक उद्योगासाठी वापरण्यात येतो.
(2) मॅगनीज :- भारतातील महत्त्वाचे मॅगनीजचे साठे महाराष्ट्रात आहेत. या खनिजांचे नागपूर व भंडारा जिल्ह्यात विपुल साठे आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात आढळून येतात. म्ॉगनिजचा उपयोग फेरोम्ॉगनिज, लोखंड व पोलाद उद्योगात तसेच ब्ॉटरी सेल उद्योगात केला जातो. राज्यातील म्ॉगनिजचे एकूण साठे 20.85 दशलक्षटन इतके आहेत.
(3) लोहखनिज :- राज्यातील महत्त्वाचे लोह खनिजांचे साठे चंद्रपूर, गडचिरोली व सिंधुदूर्ग जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात लोह खनिजाचे अंदाजित साठे 360 दशलक्ष टन आहेत. लोह खनिजाचा उपयोग स्टील व स्पॉन्ज आयर्न उद्योगात कला जातो.
(4) चुनखडक :- चुनखडकाचे विपुल साठे राज्याच्या चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत आढळतात. उच्च प्रतीच्या चुनखडकांच्या साठयाव्यतिरिक्त राज्यात बज्याच ठिकाणी कमी प्रतीचे चुनखडकाचे साठे आढळतात. राज्यात चुनखडकाचे अंदाजित साठे साठे 1,310 दशलक्षटन इतके आहेत. चुनखडकाचा उपयोग प्रामुख्याने सिमेंट तयार करण्याकरिता, लोह व पोलाद प्रकल्पात अकभवाह म्हणून तसेच इतर अनेक उद्योगात करण्यात येतो.
(5) डोलोमाईट :- डोलोमाईटचे साठे चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात आढळतात. डोलोमाईट अभिवाह म्हणून लोखंड व पोलाद उद्योगांत, कोळसा खाणीत भुकटी म्हणून तसेच शोभिवंत दगड म्हणून उपयोगात आणतात. डोलोमाईटचे महाराष्ट्रातील अंदाजित साठे 61.30 दशलक्षटन आहेत.
(6) कायनाईट-सिलीमनाईट :- राज्यातील कायनाईट व सिलीमनाईटचे साठे फक्त भंडारा जिल्ह्यात आढळतात. या खनिजांचा उपयोग धातुशास्त्रीय उद्योग, सिमेंट निर्मिती, काच निर्मिती इत्यादी उद्योगांमध्ये लागणाज्या उच्च प्रतीच्या उष्णता रोधक विटा तयार करण्याकरिता होतो. या खनिजांचे अंदाजित साठे 2.61 दशलक्षटन आहेत.
(7) बॉक्साईट :- प्रामुख्याने बॉक्साईट या खनिजापासून अॅल्युमिनियम धातूची निर्मिती होते आणि सिमेंट उद्योगातही याचा वापर करण्यात येतो. हे खनिज कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे व सातारा जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील थरात आढळते. सदर कखनजांचे महाराष्ट्रतील अंदाजित साठे 112.951 दशलक्ष टन आहेत.
(8) सिलीका वाळू :- सिलीका वाळूचे साठे मुख्यत्चेकरून राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात आढळतात. सिलीका वाळू ही ओतकामासाठी तसेच काचनिर्मितीसाठी वापरली जाते. सिलीका वाळूचे अंदाजित साठे 85.207 दशलक्ष टन आहेत.
(9) क्रोमाईट :- क्रोमाईट या खनिजाचा उपयोग मुख्यत्वेकरून धातुशास्त्रीय उद्योग, उष्णतारोधक वस्तु व रासायनिक उद्योगात केला जातो. या खनिजाचे साठे नागपूर, भंडारा, सिंधुदूर्ग व चंद्रपूर जिल्ह्यांत आढळतात. या खनिजांचे अंदाजित साठे 0.659 दशलक्ष टन आहेत.
(10) बेराईट :- हे खनिज चंद्रपूर जिल्ह्यांत आढळून येते. खनिजांचे अंदाजित साठे 0.1365 दशलक्ष टन आहेत. या खनिजाचा उपयोग मुख्यत्वेकरून तेल विहीरीच्या खोदकामात आणि पेंट उद्योगात केला जातो.
(11) तांबे :- नागपूर जिल्ह्यात तांबे हे खनिज पुलार, तांबेखाणी, कोलारी, इत्यादी ठिकाणी तसेच चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रमाणात आढळून येते. खनिजांचे अंदाजित साठे 7.708 दशलक्ष टन आहेत.
(12) जस्त :- जस्तयुक्त खनिजे नागपूर जिल्ह्यातील तांबेखाणी, कोलारी, भवरी इत्यादी गावाचे परिसरात आढळून येत असून क्षेत्रात सुमारे 8.27 दशलक्षटन खनिज साठे अंदाजित करण्यात आले आहेत. जस्त या खनिजाचा उपयोग ग्ॉलव्हनायजिंग, ब्ॉटरी, अलॉय, रसायने, संरक्षण इत्यादी उद्योग क्षेत्रात करण्यात येते.
(13) टंगस्टन :- टंगस्टन खनिज नागपूर जिल्ह्यात आगरगाव, कुही, खोबना इत्यादी क्षेत्रात आढळून येत असून 19.98 दशलक्ष टन वुल्फ्रामाईट या टंगस्टनयुक्त खनिजाचे साठे अंदाजित करण्यात आले आहेत.
(14) फ्लोराईट :- फ्लोराईट खनिज चंद्रपूर जिल्ह्यात डोंगरगाव इत्यादी क्षेत्रात आढळून येत असून 0.1. दशलक्षटन साठे अंदाजित आहेत.
No comments:
Post a Comment