१९ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
१८८१: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १८०४)
१८८२: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)
१९०६: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्यूरी यांचे निधन. (जन्म: १५ मे १८५९)
१९१०: क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९२)
१९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १८७५)
१९७४: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०७)
१९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.
१९९४: पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो यांचे निधन.
१९९८: उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९२८)
२००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)
२००४: गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचे निधन.
२००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२०)
२००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९२२)
२०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१३)
No comments:
Post a Comment