Wednesday 27 April 2022

तीन भारतीय कलाविष्कारांचा

​​📕 तीन भारतीय कलाविष्कारांचा
      गिनीज विश्वविक्रम

- त्यागया चॅरिटेबल ट्रस्टचा एक भाग असलेल्या त्यागया टीव्ही वाहिनीच्या पुढाकारामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यात तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे.

- कर्नाटीक संगीत, भरतनाट्यम आणि कुचीपुडी या कलाविष्कारांचा एकजुटीचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. या तीनही श्रेणींमध्ये एकाच मंचावर सर्वाधिक कलाकारांनी कलेचे सादरीकरण करून हा विक्रम नोंदवला.

- 1 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नईच्या रामचंद्र कन्व्हेन्शन सेंटर येथे एका स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली.

- त्यागराज पंचरत्नम संगीतावरचे नृत्यदिग्दर्शन पार्वती, कुचीपुडी तज्ञ एम.व्ही.एन. मूर्ती आणि कृष्णकुमार ह्यांनी केले होते. त्यांनी 1200 लोकांच्या बँडला प्रशिक्षण दिले.

🚦 भारतीय नृत्यशैली

- भारतात दोनशेहून अधिक लोकनृत्ये प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातल्या कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

🚦 राज्यात रुजलेले नृत्यप्रकार

-अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
-आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
-आसाम - बिहू, जुमर नाच
-उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
-उत्तराखंड - गढवाली
-उत्तरांचल - पांडव नृत्य
-ओरिसा - ओडिसी, छाऊ
-कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
-केरळ - कथकली
-गुजरात - गरबा, रास
-गोवा - मंडो
-छत्तीसगढ - पंथी
-जम्मू व काश्मीर - रौफ
-झारखंड - कर्मा, छाऊ
-मणिपूर - मणिपुरी
-मध्यप्रदेश - कर्मा, चरकुला
-महाराष्ट्र - लावणी
-मिझोरम - खान्तुम
-मेघालय - लाहो
-तामिळनाडू - भरतनाट्यम
-पंजाब - भांगडा, गिद्धा (गिद्दा)
-पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
-बिहार - छाऊ
- राजस्थान - घूमर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...