Friday, 22 April 2022

मंत्रिमंडळ-मुख्यमंत्री,मंत्री रचना

मंत्रिमंडळ-मुख्यमंत्री,मंत्री रचना

राज्य मंत्रिमंडळ(मुख्यमंत्री -कार्य ,कलम १६३ ते १६४ ,उपमुख्यमंत्री,मंत्रिमंडळाची रचना इत्यादी माहिती यातून राज्य प्रशासन बद्दल माहिती मिळेल

Contents  hide
1 राज्य मंत्रिमंडळ
1.1 मुख्यमंत्री-कार्य
1.2 कलम १६३ ते १६४
1.3 उपमुख्यमंत्री नेमणूक
1.4 मंत्रिमंडळाची रचना
राज्य मंत्रिमंडळ
भारताच्या घटनेमध्ये केंद्राप्रमाणे राज्य स्तरावर राजकीय -प्रशासकीय व्यवस्थेमध्ये खरी वास्तविक सत्ता मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळच्या आहे (राज्यपाल राज्यप्रमुख आणि मुख्यंमंत्री शासन प्रमुख )

मुख्यमंत्री-कार्य
कलम १६४ राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्त करतील (अट :विधानसभेतील बहुमतातील पक्षाला नेत्यालाच मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावे लागेल )
घटनात्मकदुरुस्त्या मुख्यमंत्री द्विगृही विधिमंडळपैकी कोणत्याही एका सभागृहाच्या सदस्य असू शकतात .

शपथ =राज्यपाल देतात


कार्य

राज्य नियोजन मंडळाचे पदशिध अध्यक्ष म्हणून करतील
राष्ट्रीय विकास परिषदचे सदस्य म्हणून
आंतर -राज्यीय परिषदेचे सदस्य म्हणून
विभागीय परिषदेचे (Zonal Council ) उपाध्यक्ष म्हणून एकावेळी एका वर्षासाठी (सर्व विभागीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृह मंत्री कार्य करतात )
राज्यशासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून
राज्य मंत्रिमंडळचे बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवितात
सेवांचे राजकीय प्रमुख म्हणून कार्य करतात .
कलम १६३ ते १६४
घटनेत फक्त १६३ व १६४ या दोन कलमाचे वर्णन केले आहे .

कलम १६३ राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्यास मंत्रिमंडळ

कलम १६३ (१) : राज्यापालास आपली कार्य पार पाडतांना स्वेच्छाधीकार वगळता इतर सहाय व सल्ल्यासाठी मुख्यामंत्रांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल .
कलम :१६३(२): राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय अंतिम असेल. ( अशी तरतूद राष्ट्रपती बाबत नाही )राज्यपालाने केलेल्या कोणत्याही कृतीची विधीग्राह्याता , त्याने स्वच्येने कृती करायला हवी होती की , नाही या कारणास्तव प्रश्नास्पद करता येत नाही .
कलम १६३ (३):मंत्र्याने राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही .
कलम १६४ मंत्रासंबंधी अन्य तरतुदी

कलम १६४ (१) मुख्यमंत्री राज्यपालाक्डून नियुक्त आणि इतर मंत्र्याची नेमणूक राज्यपाल मुख्यमंत्रीच्या सल्ल्याने करेल
विशेष छत्तीसगड ,झारखंड ,माध्येप्रदेश व ओडिशा या राज्यामध्ये १ अधिवासी कल्याण मंत्र्याची नेमणूक राज्यपाल करेल
कलम १६४ (1A):राज्य मंत्रिमंडळ एकूण मंत्र्याची संख्या मुख्यमंत्र्यांसहित विधानसभेच्या एकूण सदस्याच्या १५% पेक्षा अधिक असू नये व कमीतकमी १२ असावेत (९१ वी घटनादुरुस्ती २००३ )
कलम १६४ (1B): राज्य विधिमंडळ सदस्य पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरला असेल तर मंत्री म्हणून हि अपात्र ठरतो (९१ वी घटनादुरुस्ती २००३ )
कलम १६४(१) वैयक्तिक मंत्री राज्यपालास जबाबदार असेल
कलम १६४(२) मंत्रिमंडळ सामूहिकरीत्या विधानसभेला जबाबदार असतो.
कलम १६४ (३)मंत्र्याची शपथ ३ र्या अनुसूचित दिल्या प्रमाणे
कलम १६४(४)एखादा मंत्री सलग ६ महिने विधिमंडळ सदस्य नसेल तर अपात्र .
कलम १६४ (५)मंत्र्याचे वेतन व भत्ते विधिमंडळ कायद्याप्रमाणे
उपमुख्यमंत्री नेमणूक
घटनेत तरतुदी नाही कधीकधी गरजेनुसार मंत्रिमंडळात एखाद्या व्यक्तीचे नेमणूक करतात फक्त राजकीय कारणामुळे


मंत्रिमंडळाची रचना
घटनेमध्ये राज्यच्या मंत्रिमंडळाचा आकार तसेच प्रकार यांचाबाद्द्ल तरतुदी नाही

तीन प्रकारचे मंत्री असतात

कॅबीनेत =राज्य मंत्रिमंडळ कॅबीनेत मंत्र्याच्या गटाला कॅबीनेत म्हणतात हे पक्षाचे प्रमुख /जेष्ठ असतात यांना महत्वाचे खाते देतात मुख्य मंत्र्याकडून कॅबीनेत समित्या स्थापन करतात कारण कॅबीनेत मंत्र्याचे कामाचे तान कमी करण्यासाठी
राज्यमंत्री =यांना विभागाचे स्वतंत्र कार्यभार दिला जाऊ शकतो /कॅबीनेत मंत्र्यांना सहाय्य म्हणून
उपमंत्री = यांना विभागाचे स्वतंत्र कार्यभार दिला जात नाही हे प्रशासकीय ,राजकीय तसेच विधानमंडळातील कामकाजात मदत करतात
महारष्ट्र शासन सविस्तर माहिती

संविधान-महत्वाचे कलम,भाग/kalmachi yadi
भाग २२ ,कलमे ३९५ (संसद आणि विधिमंड,राज्यपालाल विशेष,इतरही महत्वपूर्ण कलमे),इत्यादी महत्वाचे कलम या बद्दल माहिती भाग सामन्य मुलघटनेत २२ भाग सध्या २५ आहे भारतीय राज्यघटनेतील भाग भाग तरतुदी कलम I केंद्र आणि त्याचे प्रदेश कलम १ ते ४ II नागरीत्वकलम ५ ते ११ III मुलभूत हक्ककलम १२ ते ३५ IV…

In "संविधान"

महाराष्ट्र राज्य वित्त आयोग स्थापना
राज्य वित्त आयोग घटनेचा कलम ,स्थापना ,सदस्य ,रचना,कार्य ,जबाबदारी ,राज्यात पहिला वित्त आयोग स्थापन केव्हा, GST मुले राज्यातील कर विलन इत्यादी महराष्ट्र वित्त आयोग आपणास या बद्दल सामन्य माहिती हवी जसेकी महाराष्ट्र राज्यात पहिला वित्त आयोग स्थापन केव्हा ,५ वा वित्त आयोगचे अध्यक्ष कोण ,GST मुले राज्यातील कर विलन विलीन…

राज्यपाल विशेष अधिकार/Governor
राज्यपाल सामन्य (कलम ,१५३ आणि १५४ ,नेमणूक ,पदावधी,पात्रता ,शपथ), घटनात्मक स्थिती,स्वेच्छाधिन अधिकार,राज्यपाल विशेष जबाबदाऱ्या इत्यादी माहिती राज्यपाल सामन्य राज्यपाल घाक्राज्याचा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो .कार्यकारी अधिकार त्याच्या हाती असतो .पण संसदीय पद्धतीत नाममात्र असतो . राज्यपाल हे पद कॅॅनडा देशाकून घेतले आहे कलम १५३   प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल…

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...